भविष्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक : सुरीश्वरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 01:24 AM2019-02-26T01:24:34+5:302019-02-26T01:24:51+5:30

गुरू म्हणजे जीवनात आनंदाची अनुभूती सुरू करणारी गुरुकिल्ली आहे. उपधान तपामध्ये गुरूंचे ऐकलेले प्रवचन हेच पुढील आयुष्यात वाईट गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

Need guidance of the Guru for the future: Surishwarji Maharaj | भविष्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक : सुरीश्वरजी महाराज

भविष्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक : सुरीश्वरजी महाराज

Next

नाशिक : गुरू म्हणजे जीवनात आनंदाची अनुभूती सुरू करणारी गुरुकिल्ली आहे. उपधान तपामध्ये गुरूंचे ऐकलेले प्रवचन हेच पुढील आयुष्यात वाईट गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.
लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम तीर्थधाममध्ये सुरू असलेल्या उपधान तपात प्रवचन देताना जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले की, ४७ दिवसांच्या उपधान तपात साधकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद व डोळ्यातील अश्रू हे उपधान तप सफल झाल्याचे द्योतक आहे.
उपधान तपात गुरूंच्या वाणीतून ऐकलेले प्रवचन हे पुढील आयुष्यात जेव्हापण पाप करण्यास प्रवृत्त व्हाल तेव्हा गुरूचा चेहरा डोळ्यासमोर यायला हवा, अंतरात्म्याला प्रश्न विचारायचा, मी जे काही करत आहे ते माझ्या गुरूला आवडेल का नाही. जेव्हा अंतरात्म्यातून नाही असा आवाज आला तर तेथून तुमचे पाऊल फिरायला हवे. खरे अमृत कुठे असेल हे ठाऊक नाही. पण खरे अमृत म्हणजे तुम्हाला ऐकविण्यात आलेली ही परमात्म्याची वाणी जी तुमच्या या व पुढील जीवनाला अमर बनविणार आहे, असे जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले.
शालिभद्रच्या कथेचा पुढील भाग सांगताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज म्हणाले की, शालिभद्रला कुठेही कष्टाचे जीवन जगायचे नव्हते. सुखमय जीवन, संपत्ती, ऐश्वर्य असे सर्व काही असताना हे सर्व सोडून कठीण साधू जीवन जगण्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. आपल्याकडे पावलोपावली कष्ट व काहीच नसताना संसारात गुरफटून बसलो आहे. सुख देणारे साधू जीवन जगण्याची आपली इच्छा होत नाही, असे शालिभद्रची कथा सांगताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले.

Web Title: Need guidance of the Guru for the future: Surishwarji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.