देशी पिस्तुल जप्त : नाशिकच्या संजीवनगरमधून खूनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 04:50 PM2018-01-18T16:50:22+5:302018-01-18T16:52:44+5:30

इम्रान ऐनूर शेख (१८ रा.गणेशनगर चाळ) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तो जाधव संकुल भागातील पेट्रोलपंप परिसरात कट्टा विक्रसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Native pistol confiscated: Nashik's Sanjivnagar police arrested main culprits | देशी पिस्तुल जप्त : नाशिकच्या संजीवनगरमधून खूनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधारास अटक

देशी पिस्तुल जप्त : नाशिकच्या संजीवनगरमधून खूनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधारास अटक

Next
ठळक मुद्दे इमरान यास अंबड-लिंकरोडवर गावठी कट्टयासह ताब्यात घेण्यास पोलिसांना यश सुपारी घेत सर्जेराव रामराव पोते यांचा गळा आवळून खून केल्याची कबुली

नाशिक : अंबड-लिंकरोडवरी औद्योगिक वसाहतीत एक तरुण गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या संशयितास ताब्यात घेतले. हा संशयित हिंगोलीमधील एका व्यक्तीचे अपहरण व खूनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोपनिय माहितीच्या आधारे अंबड औद्योगिक वसाहतीच्या परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी संजीवनगर भागात एक तरूण गावठी कट्टा विक्र ीसाठी आला असता त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे असा सुमारे वीस हजार २०० रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
इम्रान ऐनूर शेख (१८ रा.गणेशनगर चाळ) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तो जाधव संकुल भागातील पेट्रोलपंप परिसरात कट्टा विक्र ीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला असता तो पोलिसांच्या जाळ््यात अडकला. पेट्रोल पंपाशेजारील नव्याने सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पाच्या जवळ असलेल्या बाभळीच्या झाडाखाली येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेतले असता त्याच्या अंगझडतीत गावठी कट्टासह जीवंत काडतुसे मिळून आले. याप्रकरणी पोलिस नाईक नितीन भालेराव यांनी दिलेल्या तक्ररीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे.



हिंगोली जिल्ह्यातून अपहरण अन् खून
गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतलेला इमरान हा एका व्यक्तीचे अपहरण व खूनाच्या गुन्ह्यात फरार होता. त्याच्यासह चार साथीदारांविरुध्द हिंगोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यापुर्वी यागुन्ह्यातील हरिष बाबुराव मिरेकर व विजय देवकर या दोघा संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन हिंगोली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार इमरान व त्याचे साथीदार हरिभाऊ सातपूते व शुब्बु अप्पा यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाील तपास सुरू असतान इमरान यास अंबड-लिंकरोडवर गावठी कट्टयासह ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले. इमरान याने चार साथीदारांच्या मदतीने सातपूते यांच्याकडून सुपारी घेत सर्जेराव रामराव पोते यांचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, त्याने पोते याचा लपविलेला मृतदेह परभणी ते जिंतूर मार्गावरील जंगलात फेकून दिल्याचे सांगितले. याबाबत पुढील तपास उपनिरिक्षक आर.जी.सहारे करीत आहेत.

Web Title: Native pistol confiscated: Nashik's Sanjivnagar police arrested main culprits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.