पाणी सोडल्यास राष्ट्रवादी करणार पालकमंत्र्यांना नाशिक बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 03:31 PM2018-10-20T15:31:38+5:302018-10-20T15:32:01+5:30

नाशिक जिल्हासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात दुष्काळाची झळ बसत असताना नाशिकचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जायकवाडी धरणात सध्या ५६ टक्के पाणीसाठा असतानासुद्धा नाशिकच्या हक्काचे ७ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याची

Nationalist ban on the release of water after Nashik ban | पाणी सोडल्यास राष्ट्रवादी करणार पालकमंत्र्यांना नाशिक बंदी

पाणी सोडल्यास राष्ट्रवादी करणार पालकमंत्र्यांना नाशिक बंदी

Next


राष्ट्रवादी कॉँग्रेस : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


नाशिक : नाशिकच्या दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करूनच जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात घ्यावा तसेच नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणास दिल्यास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिक बंदी करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्हासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात दुष्काळाची झळ बसत असताना नाशिकचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जायकवाडी धरणात सध्या ५६ टक्के पाणीसाठा असतानासुद्धा नाशिकच्या हक्काचे ७ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याची गरज काय? असा प्रश्न नाशिककरांना पडलेला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यांना खुश करण्यासाठी शासनाने अभ्यास न करता हा निर्णय घेतला असून, त्याची किंमत तहानलेल्या दत्तक नाशिककरांना चुकवावी लागणार आहे. शासनाने नाशिकच्या दुष्काळी जिल्ह्यातील परिस्थितीचा अभ्यास करावा व त्यानुसार जनहितार्थ पुढील निर्णय घ्यावा. नाशिककरांवर अन्याय होणारा निर्णय जलसंपदा विभागाने घेऊन जायकवाडी धरणास पाणी सोडले तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिक बंदी करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. यावेळी शहराध्यक्ष अंबादास खैरे, अ‍ॅड. चिन्मय गाढे, रोहन नहिरे, किरण मानके, नवराज रामराजे, नीलेश सानप, डॉ. संदीप चव्हाण, भूषण गायकवाड, सुनील घुगे, राकेश जाधव, योगेश लगरे, रोहित जाधव, राज रंधावा, राहुल घोडे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Nationalist ban on the release of water after Nashik ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.