त्र्यंबकेश्वरला पावणेदोन लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 06:49 PM2018-02-19T18:49:34+5:302018-02-19T18:52:35+5:30

नाशिक : विनापरवानगी देशी- विदेशी मद्याची वाहतूक करणा-या कारसह सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा मद्यसाठा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि़१९) आंबोली -वेळूंजे परिसरातून जप्त केला़ या प्रकरणी औरंगाबाद येथील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़

nashik,Trikamkeshwar,liquor,seized | त्र्यंबकेश्वरला पावणेदोन लाखांचा मद्यसाठा जप्त

त्र्यंबकेश्वरला पावणेदोन लाखांचा मद्यसाठा जप्त

Next
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलऔरंगाबाद येथील संशयित

नाशिक : विनापरवानगी देशी- विदेशी मद्याची वाहतूक करणा-या कारसह सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा मद्यसाठा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि़१९) आंबोली -वेळूंजे परिसरातून जप्त केला़ या प्रकरणी औरंगाबाद येथील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़

ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अवैध मद्यनिर्मिती व वाहतूक याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना जव्हार-त्र्यंबकेश्वररोडने विनापरवाना देशी-विदेशी मद्याची चोरटी वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या परिसरात सापळा रचला होता़

आंबोली-वेळुंजे रस्त्यावर यापथकाने सफेद रंगाची इंडिका कार (एमएच ०४, ईएस ०१७०) अडवून तिची तपासणी केली असता त्यामध्ये दादरा नगरहवेली येथे निर्मित व केवळ त्याच ठिकाणी विक्रीचा परवाना असलेल्या विदेशी दारूचा साठा आढळून आला़ २३ हजार ४७२ रुपये किमतीचे या मद्यास महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध आहे़

स्थानिक गुन्हे शाखेने इंडिका कारमधील संशयित शेख नफिस शेख इकबाल (रा़टाकळी, पोख़ुलताबाद, जि़औरंगाबाद) व महेश माधव कांबळे (रा़एमआयटी रोड, नागसेन नगर, औरंगाबाद) या दोघांना ताब्यात घेतले असून असून त्यांच्याकडील मद्यसाठा व इंडिका कार असा १ लाख ७३ हजार ४७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून या दोघांवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, पोलीस हवालदार राजू दिवटे, पोलीस नाईक जालिंदर खराटे, पोलीस शिपाई लहू भावनाथ, कपालेश्वर ढिकले यांनी ही कारवाई केली़

Web Title: nashik,Trikamkeshwar,liquor,seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.