राम ताकवले यांना मुक्त विद्यापीठाची डी.लिट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 07:56 PM2018-03-23T19:56:58+5:302018-03-23T19:56:58+5:30

मुक्त विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांना डी.लिट. पदवीने सन्मानित केले जाणार आहे. सोमवार, दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या २४ व्या दीक्षांत सोहळ्यात ताकवले यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

nashik,ram,takawale,dlit,open,university | राम ताकवले यांना मुक्त विद्यापीठाची डी.लिट.

राम ताकवले यांना मुक्त विद्यापीठाची डी.लिट.

googlenewsNext
ठळक मुद्दे२४ व्या दीक्षांत सोहळ्यात ताकवले यांचा गौरव केला जाणार एक लाख ५४ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार

नाशिक : यशवंतराव चव्हाणमहाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांना डी.लिट. पदवीने सन्मानित केले जाणार आहे. सोमवार, दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या २४ व्या दीक्षांत सोहळ्यात ताकवले यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. ताकवले यांनी मुक्त विद्यापीठाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली असून, सर्वसामान्यांपर्यंत मुक्त शिक्षण पोहचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकºयांच्या बांधापर्यंत शिक्षण पोहचविले तरच मुक्त शिक्षणाचा हेतू सफल होऊ शकेल, अशी भूमिका घेत ताकवले यांनी तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविली. डिस्टन्स लिर्गिग अभ्यासक्रम निर्मितीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. मुक्त विद्यापीठाच्या कारकिर्दीत त्यांनी जनसामान्यांमध्ये विद्यापीठ रुजविल्याने त्यांच्या या कार्याची दखल विद्यापीठाकडून घेण्यात आली असल्याचे कुलगुरू वायुनंदन यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २४ वा दीक्षांत समारंभ सोमवार, दि. २६ रोजी विद्यापीठाच्या मुख्यालयात सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहे. या दीक्षांत समारंभात यंदा एक लाख ५४ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. याच कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांना डी. लिट. पदवीने सन्मानित केले जाणार आहे.

डी.लिट. मिळविलेले मान्यवर
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने यंदा संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांना डि.लिट. पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. मागील वर्षी लता मंगेशकर यांना या पुरस्काराने गौैरविण्यात आले होते. विद्यापीठाने यापूर्वी शांताबाई दाणी, कवी कुसुमाग्रज आणि आशा भोसले यांना डी.लिट. देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: nashik,ram,takawale,dlit,open,university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.