राष्ट्रीय  डेंग्यु दिनानिमित्ताने जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 04:48 PM2019-05-16T16:48:24+5:302019-05-16T16:49:29+5:30

नाशिक : राष्ट्रीय डेंग्यु दिनानिमित्ताने दरवर्षी १६ मे रोजी जिल्ह्यात किटकजन्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनजागृती मोहिम राबविली जाते. या मोहिमेंतर्गत ...

nashik,public,awareness,rally,occasion,national,dengue Day | राष्ट्रीय  डेंग्यु दिनानिमित्ताने जनजागृती रॅली

राष्ट्रीय  डेंग्यु दिनानिमित्ताने जनजागृती रॅली

Next


नाशिक: राष्ट्रीय डेंग्यु दिनानिमित्ताने दरवर्षी १६ मे रोजी जिल्ह्यात किटकजन्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनजागृती मोहिम राबविली जाते. या मोहिमेंतर्गत जिल्हा हिवताप कार्यालय यांच्यावतीने जिल्हा रूग्णालय येथून जनजागृती फेरी काढण्यात आली.
या रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी आरोग्य सेवा हिवताप विभागाचे सहायक संचालक डॉ. गांडाळ, उपसंचालक डॉ. पट्टणशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय देकाटे यांनी रॅलीस झेंडा दाखवलिा. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डेंग्यु जनजागृतीबाबतचे बॅनर, स्टीकर यांचे अनावरण करण्यात आले.
सकाळी आठ वाजता रॅलीस प्रांरभ झाला. जिल्हा रूग्णालय येथून सुरू झालेली रॅली जिल्हा परिषद, जनरल पोस्ट आॅफीस, शालीमार चौक, आंबेडकर पुतळला, जूने बसस्थानक, ठक्कर बझार मार्गे जिल्हा सामान्य रूग्णालय येथे रॅलीची सांगता झाली. जिल्हा हिवताप अधिकारी यांनी राष्ट्रीय किटकजन्य रोग्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.
डेंग्यु विषयक जनतेमध्ये जागृती निर्माण करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्यादृष्टीने प्रत्येकवर्षी विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहचविण्याचा प्रयत्न करणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी याप्रकारे उपक्रम राबविला जातो.
या जनजागरण मोहिमेमध्ये गाव पातळीवर डेंग्युचे लक्षणे, उपचार व डेंग्यु प्रतिरोधाच्या विविध उपाययोजना यांची माहिती जनतेपर्यंत योग्य त्या माध्यमांद्वारे पोहचविणे आवश्यक आहे. डासोत्पत्ती प्रतिबंध उपाययोजनांमध्ये लोकसहभाग वाढविणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

Web Title: nashik,public,awareness,rally,occasion,national,dengue Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.