nashik,police,gambling,place,raid | नाशिक शहरातील जुगार अड्ड्यांवर छापे : १२ जुगाऱ्यांना अटक
नाशिक शहरातील जुगार अड्ड्यांवर छापे : १२ जुगाऱ्यांना अटक

ठळक मुद्देजुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त ; जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल

नाशिक : शहरातील पंचवटी, इंदिरानगर व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून बारा जुगा-यांना अटक केली आहे़ या जुगा-यांकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरातील सिद्धी टॉवरमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि़२६) दुपारी छापा टाकला़ या ठिकाणी बाळू पगारे व त्याचे चार साथीदार कल्याण मटका नावाचा जुगार खेळत होते़ या जुगा-यांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, पंचवटी पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

दुसरी कारवाई इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील वडाळागावात करण्यात आली़ सजरा गल्लीतील जुगार अड्ड्यावर दुपारच्या सुमारास छापा टाकण्यात आला़ या ठिकाणी संशयित शेख अब्दुल पठाण व त्याचे दोन साथीदार पत्त्यांवर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत होते. या संशयितांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत जप्त करण्यात आले असून, इंदिरानगर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरी कारवाई भद्रकालीतील ठाकरे गल्लीत करण्यात आली़ पिंपळचौक परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला असता संशयित नीलेश शेलार व त्याचे तीन साथीदार ताडी दुकानाजवळील बोळीत मटका जुगार खेळत होते़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Web Title: nashik,police,gambling,place,raid
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.