एमडी ड्रग विक्री रॅकेटमध्ये मुंबईतील दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 10:07 PM2018-05-19T22:07:13+5:302018-05-19T22:07:13+5:30

नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने १६ मे रोजी पाथर्डी फाटा परिसरात तिघा संशयितांकडून २६५ ग्रॅम एमडी ड्रग जप्त केले होते़ या तिघांना ड्रगचा पुरवठा करणारे ड्रगमाफिया नदीम सलीम सौरठिया (वय ३०, रा. नागपाडा, मुंबई) व सफैउल्ला फारुख शेख (वय २३, रा. मीरारोड, मुंबई) या दोघांना मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरातून सापळा रचून अटक केली़ या दोघांकडून ड्रगच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी ८० लाख रुपयांची जॅग्वार कार व ४४ लाख रुपयांचे दोन किलो २०० ग्रॅम एमडी ड्रग्ज असा एक कोटी २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ या दोघांनाही न्यायालयाने २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़

nashik,md,drugs,sale, racker,mumbai,two,suspect,arrested | एमडी ड्रग विक्री रॅकेटमध्ये मुंबईतील दोघांना अटक

एमडी ड्रग विक्री रॅकेटमध्ये मुंबईतील दोघांना अटक

Next
ठळक मुद्दे सव्वा कोटींचा मुद्देमाल : सव्वादोन किलो ड्रगसह जॅग्वार कार गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई

नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने १६ मे रोजी पाथर्डी फाटा परिसरात तिघा संशयितांकडून २६५ ग्रॅम एमडी ड्रग जप्त केले होते़ या तिघांना ड्रगचा पुरवठा करणारे ड्रगमाफिया नदीम सलीम सौरठिया (वय ३०, रा. नागपाडा, मुंबई) व सफैउल्ला फारुख शेख (वय २३, रा. मीरारोड, मुंबई) या दोघांना मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरातून सापळा रचून अटक केली़ या दोघांकडून ड्रगच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी ८० लाख रुपयांची जॅग्वार कार व ४४ लाख रुपयांचे दोन किलो २०० ग्रॅम एमडी ड्रग्ज असा एक कोटी २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ या दोघांनाही न्यायालयाने २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़

पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व त्यांच्या पथकाने १६ मे रोजी मध्यरात्री पाथर्डी फाटा परिसरात सापळा रचून टाटा सफारी (एमएच १५ ईक्यू ५००५) वाहनातील संशयित रणजित गोविंदराव मोरे (वय ३२, रा. पाथर्डीफाटा), पंकज भाऊसाहेब दुंडे (३१) आणि नितीन भास्कर माळोदे (३२, दोघे रा. आडगाव शिवार) या तिघांना अटक केली़ या तिघांकडून २६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज व दहा लाख रुपयांची सफारी कार असा १५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता़ एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेल्या या तिघांच्या पोलीस कोठडीतील चौकशीत मुंबईतील ड्रगमाफियांची माहिती मिळाली होती़

मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये सापळा रचून गुन्हे शाखेने ड्रगमाफिया नदील सौरठिया व सफैउल्ला शेख या दोघांना २ किलो २०० ग्रॅम एमडी ड्रगसह अटक केली़ तसेच ड्रगतस्करीसाठी वापरत असलेली ८० लाख रुपये किमतीची जॅग्वार कारही जप्त केली आहे़ या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन किलो ४६५ ग्रॅम ड्रगही जप्त केले आहे़ ही कारवाई पोलीास आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व त्यांच्या पथकाने केली़


मुंबईतील कारवाईत यांचा सहभाग


पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, दीपक गिरमे, सहायक उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर, पोपट कारवाळ, जाकीर शेख, हवालदार रवींद्र बागुल, अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे संजय मुळक, वसंत पांडव, पोलीस नाईक आसिफ तांबोळी, दिलीप मोंढे, विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, विशाल काठे, गणेश वडजे, राहुल पालखेडे, प्रवीण चव्हाण, संतोष कोरडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


ड्रग्जसह गावठी कट्टे विक्रीचा गोरखधंदा


गुन्हे शाखेने अटक केलेला संशयित रणजित मोरे हा ड्रग्जसोबत गावठी कट्टे विक्रीचा गोरखधंदा करीत असल्याचे समोर आले आहे़ त्याच्याकडून कट्टे विकत घेणारे निगेहबान इम्तियाज खान (रा. टिटवाला), दीपक राजेंद्र जाधव (रा. पंचवटी), अमोल भास्कर पाटील (रा. म्हसरूळ टेक) या तिघांना ताब्यात घेतले़ या तिघाकडून सात गावठी बनावटीचे पिस्टल आणि २५ जिवंत काडतुसे असा दोन लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ याप्रकरणी भद्रकाली, इंदिरानगर, पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर्षी जानेवारी ते १९ मे या कालावधीत २८ गावठी कट्टे जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी १७ गुन्हे व ३३ संशयितांना अटक करण्यात आल्याचे आयुक्त सिंगल यांनी सांगितले़


विशेष लक्ष्य केंद्रित
शहरात ड्रग सापडण्याच्या घटनांमुळे विशेष लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे़ पालकांनीही आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून तो अमली पदार्थाच्या आहारी गेला असल्यास त्याची माहिती बिनदिक्कतपणे पोलिसांना द्या़ बहुतांशी वेळा पालक बदनामीपोटी माहिती देत नाही़ परंतु ही माहिती पोलिसांना मिळाली, तर ड्रगमाफियांच्या मुळापर्यंत पोहोचता येईल व मुलांना या व्यसनातून बाहेर काढण्यास मदत होईल़
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त

Web Title: nashik,md,drugs,sale, racker,mumbai,two,suspect,arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.