मतदार यादीत आढळली ३३ हजार दुबार, मयत नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 07:04 PM2019-07-07T19:04:51+5:302019-07-07T19:05:54+5:30

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने सुरू असलेल्या मतदार यादी पडताळणी मोहिमेत जिल्ह्यात सुमारे ३३ ...

nashik,in,the,vote,list,,people,were,found,dead | मतदार यादीत आढळली ३३ हजार दुबार, मयत नावे

मतदार यादीत आढळली ३३ हजार दुबार, मयत नावे

Next
ठळक मुद्दे निवडणूक शाखा : जिल्हाभर व्यापक शोधमोहीम


नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने सुरू असलेल्या मतदार यादी पडताळणी मोहिमेत जिल्ह्यात सुमारे ३३ हजार नावे वगळण्यात आली आहेत. मयत तसेच दुबार मतदारांची ही नावे पडताळणीत समोर आल्यानंतर वगळण्यात आली. आणखी काही नावे सापडण्याची शक्यता असून, त्याबाबतची पडताळणीदेखील सुरू करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक-२०१९ नंतर लागलीच विधानसभा निवडणूक असल्याने जिल्हा निवडणूक शाखेने मतदार याद्यांच्या पडताळणीचे काम हाती घेतले आहे. निर्दोष आणि पारदर्शक मतदार यादी असावी, यासाठी बीएलओच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यापकतेने सदर मोहीम राबविली जात आहे. लोकसभा निवडणूक-२०१९ मधील अनुभवानंतर निवडणूक शाखेकडून काळजी घेतली जात असून, विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी म्हणून मतदार यादीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पडताळणीत सुमारे ३३ हजार २५७ इतकी नावे ही मयत आणि दुबार आढळून आली असून, आणखी काही नावे अतिरिक्त निघण्याची शक्यता आहे. मतदारांकडून मतदार यादीतील नावांसंदर्भात अपेक्षित आणि वेळोवेळी काळजी घेतली जात नसल्यामुळे दुबार आणि मयत मतदारांची नावे यादीत कायम राहतात. यंदा ही संख्या मोठी असल्याचे सुरू असलेल्या पडताळणीत आढळून आले आहे. निवडणूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार नांदगावमध्ये २४९४, मालेगाव (मध्य) मध्ये ३१८४, मालेगाव (बाह्य)२५२८, बागलाण ६६१, कळवण १४५०, चांदवड ४२२३, येवला २९२७, सिन्नर ५७३६, निफाड ११५४, दिंडोरी ५०५२, नाशिक पूर्व ११११, नाशिक मध्य ७०९, नाशिक पश्चिम ४३६, देवळाली २४५ आणि इगतपुरी मतदारसंघात १२४७ याप्रमाणे नाशिक जिल्ह्यात ३३,१५७ नावे दुबार आढळून आली आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून मतदार याद्यांच्या पडताळणीच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. या कामाबरोबरच मतदारयादी शुद्धीकरण व नोंदणी, मतदान केंद्रांचा आढावा, मनुष्यबळ व्यवस्थापन, दिव्यांग मतदार कल्याण यांसह मतदार जागृती तसेच संपूर्ण विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीबाबत कामे येत्या काही दिवसांत केली जाणार आहेत.

Web Title: nashik,in,the,vote,list,,people,were,found,dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.