वाहतूक पोलिसांवर पोलीस कर्मचा-याच्या नातेवाईकाची दबंगगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 07:25 PM2018-01-08T19:25:38+5:302018-01-08T19:30:09+5:30

नाशिक :  वडाळा पाथर्डीरोडवरील केंम्ब्रिज शाळेसमोर बेशिस्तपणे वाहने उभ्या करणा-या तीस वाहनधारकांवर शहर वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले व पथकाने सोमवारी (दि़८) सकाळी कारवाई केली़ या शाळेसमोरील वाहनांची वर्दळ तसेच पाल्यांच्या पालकांकडून रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत होते़ त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती़ दरम्यान वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू असतानाच एका महिला पोलीस कर्मचा-याच्या पतीनेच पोलिसांशी वाद घातल्याची घटना घडली़

nashik,indiranagar,traffic,police,relative,Dabangagiri | वाहतूक पोलिसांवर पोलीस कर्मचा-याच्या नातेवाईकाची दबंगगिरी

वाहतूक पोलिसांवर पोलीस कर्मचा-याच्या नातेवाईकाची दबंगगिरी

googlenewsNext
ठळक मुद्देवडाळा पाथर्डी रोड : केंम्ब्रिज शाळेसमोरी रस्त्यावर बेशिस्त पार्किंग तीस वाहनधारकांवर कारवाई

नाशिक :  वडाळा पाथर्डीरोडवरील केंम्ब्रिज शाळेसमोर बेशिस्तपणे वाहने उभ्या करणा-या तीस वाहनधारकांवर शहर वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले व पथकाने सोमवारी (दि़८) सकाळी कारवाई केली़ या शाळेसमोरील वाहनांची वर्दळ तसेच पाल्यांच्या पालकांकडून रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत होते़ त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती़ दरम्यान वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू असतानाच एका महिला पोलीस कर्मचा-याच्या पतीनेच पोलिसांशी वाद घातल्याची घटना घडली़

वडाळा-पाथर्डी रस्त्यावर असलेल्या केंब्रिज शाळा भरताना व सुटताना वाहतुकीची मोठी कोंडी होते़ या शाळेच्या आवारात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था होणे अपेक्षित असताना रहदारीचा रस्त्याच वाहनतळ झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता़ शाळा सुटणे व भरण्याच्या वेळी अनेक लहान- मोठे अपघातही नियमितपणे होत असून विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणेही मुश्किल होते़ त्यामुळे सोमवारी सकाळी वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, शंकर दातीर यांचेसह वाहतुक शाखेच्या पोलिसांनी याठिकाणच्या बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई केली़

वाहतूक पोलिसांनी शाळेसमोरील रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या असलेल्या वाहनधारकांवर कारवाई सुरु झाल्याने अनेकांनी पोलिसांशी वादविवाद केला़ त्यामध्ये एका महिला पोलीस कर्मचा-याच्या पतीनेही पोलीसांशी वाद घातल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक भाले यांनी याबाबत नोंद केली आहे़ दरम्यान, पोलिसांचे नातेवाईकच वाद घालत असतील तर केवळ सामान्यांसाठीच नियम का अशी चर्चा यावेळी होती़ यावेळी सुमारे तीस बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली़

केंम्ब्रिज शाळेसमोरच्या रस्त्यावरील वाहनतळ हे लवकरात लवकर शाळेच्या आवारात जाणे गरजेचे असून रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने लावणा-यांवर दंडात्मक तसेच आवश्यकता भासल्यास वाहनजप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे भाले यांनी सांगितले.

महिला पोलीस कर्मचा-याची दबंगगिरी
प्रिती कातकाडे या पोलीस मुख्यालयात शिपाई पदावर कार्यरत असून त्यांचे पती नितिन कातकाडे यांचे दुचाकी वाहन वाहतूक पोलिसांनी अडविले तेव्हा त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला़ यानंतर कातकाडे यांनी पोलीस मुख्यालयातील पत्नीला फोन लावला पोलीस अधिका-यासोबत बोलणे करून दिल्यानंतर त्यांचे वाहन सोडण्यात आले़ त्यामुळे सामान्य नागरिकांना व पोलीस कर्मचाºयांच्या नातेवाईकांसाठी वेगळा न्याय दुजाभाव का? असा प्रश्न नागरिक विचारत होते़

Web Title: nashik,indiranagar,traffic,police,relative,Dabangagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.