इंदिरानगर ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र खेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:04 PM2018-03-23T22:04:50+5:302018-03-23T22:04:50+5:30

 nashik,Indiranagar,old,women,chain,snatching | इंदिरानगर ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र खेचले

इंदिरानगर ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र खेचले

Next
ठळक मुद्दे२७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्रजबरी चोरीचा गुन्हा दाखल

नाशिक : पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना बुधवारी (दि़२१) रात्रीच्या सुमारास राजसारथी सोसयटीजवळ घडली़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे, तर दुसरीकडे पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या प्रबोधनाकडे महिलांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृंदावन कॉलनीतील राजयोग बंगल्यातील रहिवासी विद्या विजयकुमार जोर्वेकर (६४) या बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पायी जात होत्या़ राजसारथी सोसायटीकडून वृंदावन कॉलनीतील मल्हार बंगल्यासमोरून जात असताना समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवर एक संशयित भरधाव आला़ यानंतर जोर्वेकर यांच्याजवळ दुचाकीचा वेग कमी करून गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हाताने दाबून धरल्याने ६५ हजार रुपये किमतीचे २७ ग्रॅम वजनाचे अर्धेच मंगळसूत्र चोरट्याच्या हातास लागले़

याप्रकरणी जोर्वेकर यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  nashik,Indiranagar,old,women,chain,snatching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक