nashik,indiranagar,house,breaking | इंदिरानगरमध्ये पाऊण लाखाची घरफोडी

ठळक मुद्देहॉलच्या खिडकीचे गज कापले७६ हजार २५० रुपयांचा ऐवज

नाशिक : बंद घराच्या हॉलच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी पाऊण लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना इंदिरानगरमधील पोस्ट आॅफीसजवळ घडली़
अशोक देवकर (अमेय आशिष अपार्टमेंट, पोस्ट आॅफिसच्या मागे, इंदिरानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत ते बाहेर गेले होते़ ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या हॉलमधील खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला़ यानंतर बेडरूममधील कपाटाच्या लॉकरचे हॅण्डल उचकटून लॉकर मध्ये ठेवलेले चार तोळे वजनाची सोन्याची पोत, ५ ग्रॅमचे सोन्याचे कानातील टॉप्स, ५ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, ५ ग्रॅमची सोन्याची नथ, ५ ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या व दहा हजार रुपये रोख असा ७६ हजार २५० रुपयांचा ऐवज चोरून नेला़
या प्रकरणी देवकर यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, इंदिरानगर परिसरातील नागरिक घरफोड्यांनी त्रस्त झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़