नाशिक शहरातील रुग्णालय नियमावलीवर लवकरच तोडगा : हिमगौरी आडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 11:24 PM2018-04-07T23:24:53+5:302018-04-07T23:24:53+5:30

नाशिक : खासगी रुग्णालयांसाठी बनविण्यात आलेली अग्निसुरक्षा नियमावली ही रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची आहे़ त्यामुळे सद्यस्थितीत शहरातील रुग्णालयांच्या परवाना नूतनीकरणासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नासंदर्भात मध्यस्थाची भूमिका बजावून यावर लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा हिमगौरी आडके-आहेर यांनी दिले़ इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेचा २०१८-१९ या वर्षाच्या नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यात आडके बोलत होत्या़

nashik,ima,organization,president,accession,programme | नाशिक शहरातील रुग्णालय नियमावलीवर लवकरच तोडगा : हिमगौरी आडके

नाशिक शहरातील रुग्णालय नियमावलीवर लवकरच तोडगा : हिमगौरी आडके

googlenewsNext
ठळक मुद्देआयएमए नाशिक शाखेचा २०१८-१९ पदग्रहण सोहळानूतन अध्यक्ष डॉ़ पलोड, सचिव डॉ़ चिताळकर यांनी स्वीकारली सूत्रे

नाशिक : खासगी रुग्णालयांसाठी बनविण्यात आलेली अग्निसुरक्षा नियमावली ही रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची आहे़ त्यामुळे सद्यस्थितीत शहरातील रुग्णालयांच्या परवाना नूतनीकरणासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नासंदर्भात मध्यस्थाची भूमिका बजावून यावर लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा हिमगौरी आडके-आहेर यांनी दिले़ इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेचा २०१८-१९ या वर्षाच्या नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यात आडके बोलत होत्या़

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित या पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षपदी चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर तर प्रमुख अतिथी म्हणून स्थायी समितीच्या अध्यक्ष हिमगौरी आडके-आहेर होत्या़ त्या पुढे म्हणाल्या की, हॉस्पिटल नियमावलीमुळे डॉक्टरांना परवाना नूतनीकरणासाठी अडचणी येत आहेत़ शहरातील आरोग्यसेवेशी निगडित हा प्रश्न असून यामुळे केवळ डॉक्टरच नाही तर रुग्णांवरील उपचारासंदर्भातही प्रश्न निर्माण होणार आहेत़ रुग्णालय परवाना नूतनीकरणासंदर्भात सामंजस्य व वास्तवदर्शी तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आडके यांनी यावेळी सांगितले़

आमदार डॉ़ राहुल आहेर यांनी आयएमएतर्फे राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले़ हॉस्पिटल परवाना नूतनीकरणाच्या प्रश्नासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, दिवसेंदिवस परिस्थिती शासन व प्रशासन व कायदे बदलत चालले आहेत़ वैद्यकीय व्यावसायिकांची सामाजिक सेवा लक्षात घेऊन प्रशासनाकडून सवलत मिळत गेली व वैद्यकीय व्यावसायिकांचे कायद्याकडे दुर्लक्ष होत गेले़ त्यामुळे कायद्यांबाबत आपल्याला जागरूक व्हावे लागणार असून, याबाबत प्रशासनासोबत चर्चा करून लवकरच मार्ग निघेल़ शहरातील बायोमेडिकल वेस्टच्या कराराची मुदत येत्या दोन-तीन महिन्यांत संपणार असून, हा प्रकल्प आयएमएने चालविण्यास घेण्याबाबत महापालिकेला प्रस्ताव सादर करावा, असा सल्लाही आहेर यांनी दिला़

नूतन अध्यक्ष डॉ़ आवेश पलोड यांनी कर्करोगासह तत्सम दुर्धर आजारात रुग्णाच्या अखेरच्या काळात देखभाल, उपचार करण्यासाठी आयएमए ‘हॉसपीस’ ही संकल्पना राबविणार असल्याचे सांगितले़ मुंबईचा अपवाद वगळता अन्यत्र उपलब्ध नसलेली ही संकल्पना नाशिकमध्ये दिंडोरी रस्त्यावरील महाराष्ट्र टीबी सॅनिटोरियममध्ये प्रथमच राबविली जाणार आहे़ अखेरच्या काळात नातेवाईक नसलेल्या रुग्णांना या व्यवस्थेद्वारे मानसिक आधार देण्याचे काम केले जाणार असल्याचे पलोड यांनी सांगितले़ या पदग्रहण सोहळ्याची सुरुवात राहुल पाठक या विद्यार्थ्याने सादर केलेल्या गणेशवंदनेने झाली़ यानंतर मावळते अध्यक्ष डॉ़ मंगेश थेटे यांनी वर्षभर राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली़

आयएमएचे नूतन अध्यक्ष डॉ़ आवेश पलोड यांनी मावळते अध्यक्ष डॉ़ मंगेश थेटे यांच्याकडून तर डॉ़ हेमंत सोननीस यांच्याकडून नूतन सचिव डॉ़ नितीन चिताळकर यांनी पदभार स्वीकारला़ याबरोबरच उपाध्यक्ष डॉ़ नीलेश निकम, डॉ़ प्रशांत देवरे, डॉ़ विशाल गुंजाळ, डॉ़ सुषमा दुगड, डॉ़ वैशाली काळे, डॉ़ विशाल पवार यांनीही आपला पदभार स्वीकारला़ यावेळी मान्यवरांच्या हस्ते आयएमएच्या व्हाईस या मासिकाचे अनावरण करण्यात आले़ यावेळी आयएमएचे मावळते व नूतन पदाधिकारी तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ़ प्राजक्ता लेले व डॉ़ पंकज भदाणे यांनी केले़

Web Title: nashik,ima,organization,president,accession,programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.