आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा  मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:01 PM2018-02-08T14:01:02+5:302018-02-08T14:05:25+5:30

nashik,empowerment,Health University,Contract Employees | आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा  मोर्चा

आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा  मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देकिमान वेतन मागणीसाठी कामबंद आंदोलनआंदोलनाचा ६३ वा दिवस, पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर घोषणाबाजी

   नाशिक : महाराष्ट्र  आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या १० ते १२ वर्षांपासून स्थायी स्वरुपाचे काम करणाऱ्या  सुमारे ३०० कर्मचार्यांनी किमान वेतन मिळावे आणि कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले असून या कामगारांच्या मागण्यांकडे विद्यापीठाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालावर मोर्चा काढला.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचार्यांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाला कामगार उपायुक्त तसेच कामगार न्यायालयात पुरेसे उत्तर देता आले नसतांना आणि कंत्राटी कर्मचारी विद्यापीठाचेच असल्याचे मान्य करूनही विद्यापीठाने अद्यापही कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय दिलेला नसल्याने आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. गेल्या ५ डिसेंबर २०१७ पासून कंत्राटी कर्मचारी समान काम, समान दाम, याप्रमुख मागणीसह निलंबीत कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घ्यावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना विद्यापीठ सेवेत सामावून घ्यावे अशा सात मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा ६३ वा दिवस आहे.
या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी विद्यापीठ प्रशासन आणि पालकमंत्र्यांना भेटून आपली कैफीयत मांडलेली आहे. विद्यापीठाकडून नेहमीच आश्वासन देण्यात आले मात्र नंतर कोणीही कार्यवाही केलेली नाही. तर पालकमंत्री गिरीश महाजन यांना देखील तीन वेळेले भेट दिलेली आहे. मात्र त्यांनी देखील अद्याप सकारात्मक भूमिका घेतली नसल्याने गुरूवारी गोल्फ क्लब मैदान ते पालकमंत्री महाजन यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
सीटचे अध्यक्ष डॉ. डी.ए.ल कराड, रसचिटणीस सिताराम ठोंबरे, तानाजी जायभावे, अ‍ॅड. श्रीधर देशपांडे आदि नेत्यांसह कंत्राटी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. गोल्फ क्लब मैदान येथून सकाळी ११ वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. उंटवाडी रोडवरील पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालापर्यत मोर्चा काढण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. निलंबीत कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घ्यावे, समान काम, समान वेतन मिळावे, कर्मचाऱ्यांना पुर्वलक्षी प्रभावाने घरभाडे अदा करावे, किमान वेतन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना सुट्यांचे नियोजन, २६ दिवसांचे वेतन, कामगारांना पेमेंटस्लिप, कायदेशीर पगारी रजा, व बोनस या कामगारांच्या प्रश्नांकडे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.

Web Title: nashik,empowerment,Health University,Contract Employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.