नाशिकमध्ये दोन दिवसांत १६ बसेसचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 8:03pm

भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद नाशिकमध्ये उमटल्याने गेल्या दोन दिवसांत या घटनेत राज्य परिवहन महामंडळाच्या एकूण १६ बसेसचे नुकसान झाले. यामध्ये जळगाव आणि नाशिक आगाराच्या बसेसचा समावेश आहे.

घटनेचे पडसाद : शिवशाही बसच्याही काचा फोडल्या नाशिक : भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद नाशिकमध्ये उमटल्याने गेल्या दोन दिवसांत या घटनेत राज्य परिवहन महामंडळाच्या एकूण १६ बसेसचे नुकसान झाले. यामध्ये जळगाव आणि नाशिक आगाराच्या बसेसचा समावेश आहे. मंगळवारी ११ गाड्यांना आंदोलनकर्त्यांनी लक्ष्य केले होते, तर बुधवारी चार बसेसचे नुकसान करण्यात आले. त्यामध्ये आताच महामंडळाच्या ताफ्यात रुजू झालेल्या शिवशाही बसचा समावेश आहे. या घटनेत किती नुकसान झाले याची पडताळणी अद्याप झाली नसल्याचे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात असंतोष पसरला असून, नाशिकमध्येदेखील अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. समाजबांधवांनी मोर्चा काढून घटनेचा निषेध नोंदविला होता. मंगळवारी दुपारनंतर आंदोलनाला वेगळे वळण लागले आणि अनेक ठिकाणी बसेस तसेच खासगी वाहनांवर दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये प्रवासी तसेच खासगी वाहतूक करणाºया वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे दुपारनंतर लांब पल्ल्याच्या तसेच शहरातील सर्व बसेस बंद करण्यात आल्या होत्या. मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी ११ बसेसचे, तर बुधवारी बंद आंदोलनाच्या काळात शहरात चार बसेसचे नुकसान करण्यात आले. संतप्त आंदोलनकर्त्यांनी द्वारका येथे दोन, तर अमृतधाम येथे एक आणि नवीन बसस्थानकात घुसून शिवशाही बसच्या काचा फोडल्या. या प्रकरणी एस.टी. कर्मचाºयांनी तीन आंदोलनकर्त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या आंदोलनात बुधवारी जळगाव आगाराची अंमळनेर-मुंबई (एमएच २० बीएल-३०१४), नाशिक-१ आगाराची धुळे-नाशिक (एमएम १४ बीटी-४८९२), जळगाव आगाराची जळगाव-नाशिक (एमएस २० डीएल-२६५७) आणि ठक्कर बसस्थानकात उभी असलेली औरंगाबाद-नाशिक शिवशाही बस (क्र. एमएच ०६ बीडब्ल्यू-०४७३) या बसेसचे नुकसान करण्यात आले. काल आंदोलनकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी ११ बसेसचे नुकसान केले होते.

संबंधित

सतर्कतेने टळला बसचा अपघात
खासगी कामगारांचा ‘एसटी’तून मुक्त प्रवास
१२ वर्षानंतर नटाळा गावात पोहोचली बस
सिन्नर तालुक्यात पोलिसांनी अडवला आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा 
साकोरेतील मुर्ती दृष्टांतामुळे सापडल्याचा दावा फोल

नाशिक कडून आणखी

जिल्ह्यात खरिपाची ६१ टक्के पेरणी
पाऊलखुणा पुसत चोरट्यांची इंदिरानगरला घरफोडी
चोरीचे तीन लाखांचे मोबाइल जप्त
मुक्तिधाम मंदिरात हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण
आठवडे बाजार हटविताना वाद

आणखी वाचा