नाशिकमध्ये आवासच्या अध्यक्षाला जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 10:26 PM2018-06-06T22:26:20+5:302018-06-06T22:29:00+5:30

नाशिक : गोमांसची वाहतूक करणारी पिकअप अडविल्याच्या रागातून नाशिकमधील आवास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गौरव क्षत्रिय यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़६) सांयकाळच्या सुमारास वडाळा पाथर्डी रस्त्यावर घडली़ यामध्ये क्षत्रिय गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, संबंधित पिकअप चालक फरार झाला आहे़

Nashik,aawas,president,try,kill | नाशिकमध्ये आवासच्या अध्यक्षाला जीवे मारण्याचा प्रयत्न

नाशिकमध्ये आवासच्या अध्यक्षाला जीवे मारण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्दे गोमांसची वाहन अडविण्याचा प्रयत्नवडाळा पाथर्डी रस्त्यावरील घटना

नाशिक : गोमांसची वाहतूक करणारी पिकअप अडविल्याच्या रागातून नाशिकमधील आवास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गौरव क्षत्रिय यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़६) सांयकाळच्या सुमारास वडाळा पाथर्डी रस्त्यावर घडली़ यामध्ये क्षत्रिय गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, संबंधित पिकअप चालक फरार झाला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गौरव क्षत्रिय (३०) हे वडाळा - पाथर्डी रस्त्यावरील जिल्हा परिषद कॉलनी, चार्वाक चौक कलानगर चौकात उभे होते़ त्यांना एका पिकअपमधून (MH-15, 6623) गोमांस घेऊन जात असल्याचा संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून वाहन थांबवून विचारपूस केली़ या पिकअपचालकाने उडवा-उडवीचे उत्तर दिल्याने क्षत्रिय हे वाहनाच्या पुढे गेले व फोटो काढण्यास सुरूवात केली़

गोमांसची वाहतूक करणाऱ्या पिकव्हॅन चालकाने पकडले जाण्याच्या भितीने क्षत्रिय यांच्या अंगावर गाडी घालून वडाळा - पाथर्डी मार्गे पाथर्डी गावाकडे पळून गेला़ यामध्ये गौरव क्षत्रिय हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नागरिककांनी तातडीने लेखानगर येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या घटनेची इंदिरानगर पोलिसांनी नोंद केली आहे़

Web Title: Nashik,aawas,president,try,kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.