नाशकात भूगर्भ शास्त्रज्ञ ठोकणार दोन वर्षे तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 01:43 AM2018-10-19T01:43:41+5:302018-10-19T01:43:58+5:30

नाशिक जिल्ह्णातील कळवण व पेठ या तालुक्यांच्या सीमेवर वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीच्या भूगर्भ विभागाचे शास्त्रज्ञ आगामी दोन वर्षे नाशकात तळ ठोकणार असून, त्यात भूगर्भातील हालचाली व भूकंपाचे धक्के बसण्यामागच्या कारणांची मीमांसा केली जाणार आहे. भूकंपाच्या संभाव्य नुकसानीपासून बचावासाठी या काळात उपाययोजनेचा आराखडाही तयार केला जाणार आहे.

In the Nashik, an underground scientist will be staged for two years | नाशकात भूगर्भ शास्त्रज्ञ ठोकणार दोन वर्षे तळ

नाशकात भूगर्भ शास्त्रज्ञ ठोकणार दोन वर्षे तळ

Next
ठळक मुद्देदोन वर्षे अभ्यास : भूकंपाचा केंद्रबिंदू शोधणार

नाशिक : नाशिक जिल्ह्णातील कळवण व पेठ या तालुक्यांच्या सीमेवर वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीच्या भूगर्भ विभागाचे शास्त्रज्ञ आगामी दोन वर्षे नाशकात तळ ठोकणार असून, त्यात भूगर्भातील हालचाली व भूकंपाचे धक्के बसण्यामागच्या कारणांची मीमांसा केली जाणार आहे. भूकंपाच्या संभाव्य नुकसानीपासून बचावासाठी या काळात उपाययोजनेचा आराखडाही तयार केला जाणार आहे.
गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दळवट, जयदर या पेठ तालुक्यातील गावांबरोबरच कळवण तालुक्यातील ओतूर, कुंडाणे आदी गावांना गेल्या काही वर्षांपासून भूकंपाचे धक्के बसू लागले आहेत. रिश्टल स्केलवर या धक्क्यांची नोंद ३ सेल्सिअस असली तरी, त्यात भविष्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भूकंपामुळे जीवित व वित्तहानी आजवर झालेली नाही, मात्र भूगर्भातील हालचालींमुळे विहिरींचे पाणी आटणे, घरांना तडे जाण्याचे प्रकार होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नाशिक शहरालाही गेल्या वर्षभरात दोन ते तीन वेळा भूकंपाचे हलके धक्के बसले, त्याचा केंद्रबिंदू नाशिकपासून ३० किलोमीटर अंतरावर दर्शविण्यात आला. त्यामुळे नाशिकपासून जवळ असलेल्या या दोन्ही तालुक्यांतील भूगर्भात काही तरी गंभीर हालचाली होत असल्याचा अंदाज आहे. त्याची दखल घेत भूगर्भातील या साºया हालचालींबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून वेळोवेळी राज्य सरकारला कळविण्यात आले व केंद्र सरकारलाही त्याबाबत अवगत करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन गेल्या आठवड्यात भूगर्भ शास्त्रज्ञांच्या एका पथकाने नाशिक येथे भेट देऊन भूकंपाचे धक्के जाणवणाºया गावांची सविस्तर माहिती करून घेतली. तसेच भूकंपरोधक आराखडाही तयार करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने रिश्टर स्केलवर एक ते तीन यादरम्यान धक्के बसणाºया गावांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीखालच्या मातीचे परीक्षण तसेच भूगर्भातील पाण्याचे नमुने घेण्यात येणार आहेत. त्याचा आधार घेऊनच पुढील उपाययोजना केली जाणार असून, याकामी मेरीची मदत घेण्यात येणार आहे.
व्याप्ती वाढू लागल्याने चिंता
भूकंपाचे धक्के जाणवणारी गावे प्रामुख्याने डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे त्याचे गांभीर्य अधिक असून, यापूर्वी फक्त दळवट येथेच बसणाºया भूकंपाच्या धक्क्याची व्याप्ती वाढत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यातील धोके टाळण्यासाठी दिल्लीतील तीन भूगर्भ शास्त्रज्ञ सलग दोन वर्षे कायमस्वरूपी नाशकात तळ ठोकून भूगर्भातील हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत.

Web Title: In the Nashik, an underground scientist will be staged for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.