नाशिक कॉँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांना जिवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 05:11 PM2018-01-16T17:11:22+5:302018-01-16T17:12:44+5:30

जय हिंदू राष्ट्र नावाने आलेल्या पत्रात, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे गुनगाण का करतो, तुला शेवटची संधी नाहीतर महात्मा गांधींना भेटायला पाठवावे लागेल, असे सांगत समजले नाही तर जीव गमवशील, अशी धमकी देण्यात आली आहे.

 Nashik: Threatens to kill city council president Vasant Thakur | नाशिक कॉँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांना जिवे मारण्याची धमकी

नाशिक कॉँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांना जिवे मारण्याची धमकी

Next
ठळक मुद्दे...नाहीतर महात्मा गांधींना भेटायला पाठवावे लागेलसमजले नाही तर जीव गमवशील

नाशिक : शहर कॉँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांना जिवे मारण्याची धमकी देणारे निनावी पत्र प्राप्त झाले असून, या प्रकरणी त्यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
जय हिंदू राष्ट्र नावाने आलेल्या पत्रात, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे गुनगाण का करतो, तुला शेवटची संधी नाहीतर महात्मा गांधींना भेटायला पाठवावे लागेल, असे सांगत समजले नाही तर जीव गमवशील, अशी धमकी देण्यात आली आहे. २०१४ मध्ये महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून त्यांचे विचार तरुणांपर्यंत पोहचावे यासाठी सर्वात मोठी गांधी टोपी बनविली होती. तीन बाय पन्नास फुटांच्या या टोपीची गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड व लिम्का बुक आॅफ रेकार्डला नोंद झाली होती. याबाबतचे प्रमाणपत्रही ठाकूर यांना प्राप्त झालेले आहे. यात धर्तीवर ठाकूर यांनी २ आॅक्टोबर २०१७ रोजी गांधी यांचा सर्वात मोठा चष्मा तयार करत त्यांना आदरांजली वाहली होती. या माध्यमातून गांधींची ओळख आजच्या पिढीला व्हावी, अशी भूमिका होती. याशिवाय गांधी जयंती व पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याकडून विविध कार्यक्र म घेतले जातात. सोमवारी (दि.१५) शहर कॉँग्रेस कमिटीत हे पत्र प्राप्त झाले आहे.
सदर धमकीचे पत्र व त्यासोबत गांधी हत्या गोडसेकडूनच अन्य गूढ कोणीही नव्हते! या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीवर काट मारण्यात आलेली प्रत प्राप्त झाली आहे.
......

मला यापूर्वीदेखील अशा प्रकारच्या धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. तसेच गांधी जयंतीच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या रथाची काचदेखील फोडण्यात आली आहे. या प्रकाराची पोलिसांत तक्र ार करण्यात आली आहे.
- वसंत ठाकूर, शहराध्यक्ष, कॉँग्रेस सेवादल

Web Title:  Nashik: Threatens to kill city council president Vasant Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.