नाशिक सिन्नर टोलनाक्याप्रश्नी शिंदे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 03:57 PM2017-11-29T15:57:03+5:302017-11-29T16:10:27+5:30

 Nashik Sinnar Tolaplaza Prashnani Shinde Vigilance Vigilance | नाशिक सिन्नर टोलनाक्याप्रश्नी शिंदे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा

नाशिक सिन्नर टोलनाक्याप्रश्नी शिंदे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देटोलविरोधी कृती समितीचा आंदोलनाचा इशारास्थानिक नागरिकांना मिळावी टोलमाफीटोलनाका नागरीवस्तीपासून दूर हटविण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आंदोलन

नाशिक : शिंदे पंचक्रोशीतील तसेच परिसरातील स्थानिक नागरिकांच्या सर्व खासगी व व्यावसायिक वाहनांना नाशिक- पुणे महामार्गावर टोलनाक्यावर टोल आकारण्यात येऊ नये, या मागणीसाठी शिंदे पंचक्रोशीतल टोल विरोधी कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुरुवारी (दि.30) आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शिंदे टोलनाका प्रश्नी शिंदे गावासह पंचक्रीशीतील मोहू , चिंचोली, पळसे, चांदगिरी, जाखोरी, मोहदरी, मोहगाव, ब्राम्हणगाव, कोटमगाव, वडगाव हिंगनवेढे, आदि गावांतील शेतकरी, नागरिक, व्यापारी वर्गाला हा टोलनाका डोखेदुखी ठकरणार असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले सून या टोलनाक्यावरून परिसरातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
टोलनाक्याच्या 10 किमी परिघातील गावांच्या नागरिकांना टोल आकारणीतून माफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थ टोलविरोधी कृती समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करणार आहे. नाशिक पुणे महामार्गावर शिंदे परिसरात नागरी वस्तीच्या भागात नाशिक सिन्नर टोलवेज सुरु करण्यात आला आहे. परंतु, या परिसरातील नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी अनेकदा सिन्नर व नाशिकला यावे-जावे लागत असल्याने त्यांना टोलनाक्याचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. टोलनाका ओलांडताना रोज टोल भरणे अडचणीचे ठरणार आहे. तसेच नागरिकांचे आर्थिक नुकसानही होणार असल्याने परिसरातील नागरिक या टोलनाक्याविरोधात एकवटले असून टोल आकारणी माफ व्हावी या मागणीसाठी सर्व नागरिकांसह शेतकरी व्यापारी व विविध व्यावसायिक जिल्हाधिकारालयाच्या आवारात आंदोलन करणार आहेत. टोलनाक्यापासून दहा किमी अंतराच्या परिघात नागरी वस्ती असल्याने रुग्णवाहिका, विद्यार्थांची वाहतूक करणारी वाहने यांचीही गैरसोय होणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे टोलनाका नागरी वस्तीपासून दूरच्या अंतरावर हलविण्यात यावे तसेच टोलनाक्यावर रुग्णवाहिका आणि कर्मचाऱ्यांची संख्याही वाढविण्याची मागणी टोल विरोधी कृती समितीने केली आहे.

Web Title:  Nashik Sinnar Tolaplaza Prashnani Shinde Vigilance Vigilance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.