विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून नाशिक सेनेत बंडाळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 02:58 PM2018-03-22T14:58:36+5:302018-03-22T14:58:36+5:30

येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष या निवडणुकीचा फड रंगणार असला तरी, शिवसेनेत तो आत्तापासूनच उमेदवारीवरून रंगू लागला आहे. गत निवडणुकीत सेनेचे संख्याबळ कमी असतानाही अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी राष्टÑवादीचे जयंत जाधव यांच्याशी काट्याची टक्कर दिली होती. तांत्रिक मुद्यावरून सहाणे यांची आमदारकी निसटली.

Nashik Senate rebellion on the Legislative Council election? | विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून नाशिक सेनेत बंडाळी?

विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून नाशिक सेनेत बंडाळी?

Next
ठळक मुद्देदराडे की सहाणे : गटबाजीमुळे दोन्ही गट सक्रीयसहाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून उमेदवारी मिळविण्याच्या मुद्यावरून शिवसेनेत बंड होण्याची चिन्हे दिसू लागली असून, त्याची सुरूवात एकमेकांच्या भेटी गाठी घेण्यापासून सुरूवात झाली आहे. गत वेळचे पराभुत अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी उमेदवारीवर दावा केलेला असतानाच जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासाठी एक गट कमालिचा सक्रीय झाल्यामुळे तुर्त दराडे यांचे पारडे जड दिसू लागल्याने प्रत्यक्षात निवडणुकीच्या तोंडावर पक्षात बंडाळी उफाळणे शक्य वाटू लागले आहे.
येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष या निवडणुकीचा फड रंगणार असला तरी, शिवसेनेत तो आत्तापासूनच उमेदवारीवरून रंगू लागला आहे. गत निवडणुकीत सेनेचे संख्याबळ कमी असतानाही अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी राष्टÑवादीचे जयंत जाधव यांच्याशी काट्याची टक्कर दिली होती. तांत्रिक मुद्यावरून सहाणे यांची आमदारकी निसटली. त्यामुळे सहा वर्षापुर्वी पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा विचार यंदाच्या निवडणुकीत होवून आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी ठाम खात्री सहाणे यांना वाटू लागली आहे व त्यादृष्टीने सहाणे यांनी पक्षांतर्गंत प्रचारही सुरू केला आहे. सोशल माध्यमाचा वापर करून त्यांनी तसे संकेत देणे सुरू केले आहे. दुसरीकडे सेनेतील एका गटाने जिल्हा बॅँ केचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारीसाठी मोठी फिल्डींग लावली आहे. मध्यंतरी दराडे यांनी मातोश्रीवर जावून पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेवून तशी तयारीही दर्शविल्याचे सांगण्यात येते. सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दराडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून, पक्षाने त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. सहाणे यांना दराडे यांच्या उमेदवारीची कुणकुण लागल्यामुळेच की काय त्यांनी पर्याय म्हणून भाजपाची उमेदवारी करण्याचीही तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे, त्याचाच भाग म्हणून मध्यंतरी सहाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. नेमके याच गोष्टीचे भांडवल करून सहाणे विरोधकांनी कुरघोडी करण्यास सुरूवात केली आहे. सेनेंतर्गंत उमेदवारीवरून सुरू असलेल्या रस्सीखेचचा संबंध नुकत्याच झालेल्या स्थानिक पातळीवरील महानगरप्रमुखांच्या फेरबदलाशी लावला जात असून, ज्या गटाने हा फेर बदल करून आणला आता तोच गट दराडे यांच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे सेनेतील गटबाजीचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता दिसू लागली आहे.

Web Title: Nashik Senate rebellion on the Legislative Council election?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.