नाशिक पुन्हा तापले; पारा ३९ अंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:41 AM2018-04-25T00:41:29+5:302018-04-25T00:41:29+5:30

शहराचे तपमान मागील दहा दिवसांपूर्वी चाळिशीच्या पुढे गेल्याने नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका जाणवत होता. मात्र मागील पाच दिवसांपासून तपमान पुन्हा कमी होऊन ३६ अंशांपर्यंत खाली आले होते; मात्र मंगळवारी कमाल तपमान ३९ अंश इतके नोंदविले गेले.

Nashik reopened; Mercury of 39 degrees | नाशिक पुन्हा तापले; पारा ३९ अंश

नाशिक पुन्हा तापले; पारा ३९ अंश

Next

नाशिक : शहराचे तपमान मागील दहा दिवसांपूर्वी चाळिशीच्या पुढे गेल्याने नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका जाणवत होता. मात्र मागील पाच दिवसांपासून तपमान पुन्हा कमी होऊन ३६ अंशांपर्यंत खाली आले होते; मात्र मंगळवारी कमाल तपमान ३९ अंश इतके नोंदविले गेले.  पंधरवड्यानंतर शहर कमालीचे तापत असून, वाढत्या उष्म्याने नाशिककर हैराण झाले आहेत. शहराच्या तपमानाचा पारा पुन्हा चाळिशीकडे सरकू लागल्याचे दिसत आहे. यावर्षी नाशिककरांना कडक उन्हाळा अनुभवयास येत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एप्रिलमध्ये अधिक उष्णता जाणवत आहे. मंगळवारी सकाळपासून प्रखर ऊन जाणवत होते. त्यामुळे वातावरणात उष्माही प्रचंड वाढल्याचा अनुभव नागरिकांना आला. वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाल्याने घामाघूम झाले. वाऱ्याचा वेगही प्रचंड मंदावला होता. शहरातील रस्ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दिसून आला. सूर्यास्तानंतर नाशिककर थंड वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी गोदाकाठावर तसेच गोदापार्क व शहरातील उद्यानांच्या दिशेने वळाले. शाळांना सुटी लागल्याने संध्याकाळी शहरातील काही उद्याने गजबजलेली होती.
बर्फापासून व्हा सावध !
उन्हाच्या तीव्रतेमुळे जिवाची काहिली होत असल्यामुळे नाशिककर दिलासा मिळविण्यासाठी शीतपेयं व बर्फाचा वापर असलेले थंड पदार्थ सेवन करताना दिसून येत आहेत; मात्र बफर् ामुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. कारण बर्फाची शुद्धता व दर्जाबाबत साशंकता आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण टिकू न राहावे यासाठी भरपूर पाणी प्यावे; मात्र उन्हामधून आल्यास तत्काळ फ्रिज किंवा माठामधील पाणी पिणे टाळावे. काही वेळ घरात बसल्यानंतर पाणी प्यावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच जास्तवेळ बाजारात खरेदीसाठी फिरत असताना उसाचा रस किंवा अन्य प्रकारच्या फ ळांचा रस पिणे टाळावे, असा सल्लाही डॉक्टर देत आहेत.

Web Title: Nashik reopened; Mercury of 39 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.