नाशिकमध्ये पाकीस्तानचे पुतळे जाळून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 07:03 PM2019-02-15T19:03:00+5:302019-02-15T19:08:38+5:30

सोशल मिडीयावर पाकीस्तानचा कठोर निषेध करण्यात आला. अनेकांनी त्यासाठी डीपी बदलले. तसेच सकाळपासूनच अनेक गु्रपवर गुडमॉर्निंग, विनोद पाठविण्यास मनाई करण्यात आली होती. शहीदांना श्रध्दांजली अर्पण करणारे तसेच पाकीस्तान विषयी संताप व्यक्त करणारे संदेशच पाठविले जात होते.

In Nashik, protests by burning firewood of statues | नाशिकमध्ये पाकीस्तानचे पुतळे जाळून निषेध

नाशिकमध्ये पाकीस्तानचे पुतळे जाळून निषेध

googlenewsNext
ठळक मुद्दे अतिरेकी हल्याबद्दल संतापदहशतवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना फाशीमुस्लीम बांधवांनी ठिकठिकाणी निषेध केला

नाशिक- पुलवामा येथे दहशतवादी हल्यात ४४ जवान शहीद झाल्याने नाशिकमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून दहशवादाबरोबरच पाकीस्ताने प्रतिकात्मक पुतळे आणि ध्वज जाळून निषेध करण्यात आला. आता बस्स, पाकीस्तानच नांगी ठेचा अशा संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आला.
दहशतवादी हल्यामुळे सोशल मिडीया आणि वॉटसअपवर संतापाबरोबरच शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली त्याच बरोबर सकाळपासूनच शहराच्या विविध भागात पाकीस्तान आणि दहशतवादाच्या विरोधात आंदोलने झाली. भाजपाच्या वतीने रविवार कारंजा येथे पाकीस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर दुपारी शुक्रवारची बडी नमाज पठण झाल्यानंतर मुस्लीम बांधवांनी ठिकठिकाणी निषेध केला. दुध बाजारात जमलेल्या मुस्लीम बांधकांनी पाकीस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली. छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडनेही दहशतवादाचा पुतळा जाळला. कॉँग्रेस, राष्टÑवादी यांच्या वतीनेही पुतळे दहनाचे कार्यक्रम झाले. तर सायंकाळी पक्षविरहीत देशप्रेमी नागरीकांनी गंगापूररोडवरील शहीद चौकातून मेणबत्ती मोर्चा काढला होता. भोसला मिलटरी स्कुलच्या वतीने विद्यार्थ्यांनी शहीद चौकापर्यंत फेरी काढली होती.
 

Web Title: In Nashik, protests by burning firewood of statues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.