नाशिकमधील प्रवाशांनी जल्लोषात साजरा केला पंचवटी एक्स्प्रेसचा 43वा वाढदिवस 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 09:05 AM2017-11-01T09:05:10+5:302017-11-01T14:53:36+5:30

नाशिककरांनी  बुधवारी (1 नोव्हेंबर ) सकाळी पंचवटी एक्स्प्रेसचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला.

Nashik: Passengers celebrate the 43rd birthday of Panchavati Express | नाशिकमधील प्रवाशांनी जल्लोषात साजरा केला पंचवटी एक्स्प्रेसचा 43वा वाढदिवस 

नाशिकमधील प्रवाशांनी जल्लोषात साजरा केला पंचवटी एक्स्प्रेसचा 43वा वाढदिवस 

Next

संजय पाठक/नाशिक -  नाशिककरांनी  बुधवारी (1 नोव्हेंबर ) सकाळी पंचवटी एक्स्प्रेसचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. घरातील एखाद्या सदस्याचा तसंच मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस ज्याप्रमाणे साजरा केला जातो, त्याच पद्धतीनं या चाकरमान्यांनी त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अविभाज्य घटक असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला.   

ढोल ताशांच्या गजरात, रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या पंचवटी एक्स्प्रेसचे स्वागत करण्यात आले.  1 नोव्हेंबर 1975 हा पंचवटी एक्स्प्रेसचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून पंचवटी एक्स्प्रेसचा शुभारंभ केला होता. सुरुवातीला 18 डब्यांच्या या एक्स्प्रेसला नाशिकच्या चाकरमान्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता डब्यांची संख्या  21 वर करण्यात आली. दररोज 261 किलोमीटर धावणारी पंचवटी एक्स्प्रेस मुंबईतील मंत्रालयात काम करणारे कर्मचारी तसेच अन्य नोकरदार व्यावसायिक, विद्यार्थी यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.

नाशिक ते मुंबई असा नियमित प्रवास करणाऱ्या रेल परिषदेने विविध उपक्रम राबवून पंचवटीच्या कोचला 'आदर्श कोच' अशी लिम्का बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर पंचवटी एक्स्प्रेसची प्रतिकृती असलेला आकर्षक केक आणून तो कापण्यात आला. रेल्वेच्या या अभिष्टचिंतन सोहोळा साजरा करण्यासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे तसेच आमदार योगेश घोलप उपस्थित होते.

Web Title: Nashik: Passengers celebrate the 43rd birthday of Panchavati Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.