नाशिक बाजारपेठेत मेथी, शेपूची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:42 AM2018-11-17T11:42:26+5:302018-11-17T11:43:46+5:30

भाजीपाला :  मेथी, शेपू, तसेच कांदापातही मोठ्या प्रमाणात विक्रीस येत आहे.

In the Nashik market, the vegetables supply increased | नाशिक बाजारपेठेत मेथी, शेपूची आवक वाढली

नाशिक बाजारपेठेत मेथी, शेपूची आवक वाढली

googlenewsNext

दोन दिवसांपूर्वी नाशिक शहराच्या किमान तापमानाचा पारा ११.५ अंशांपर्यंत घसरल्याने थंडीचा कडाका वाढल्यामुळे पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मेथी, शेपू, तसेच कांदापातही मोठ्या प्रमाणात विक्रीस येत आहे.

कमी पाण्यावर उत्पादित केलेला भाजीपाला पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मेथीची २२,३०० जुडी आवक होऊन १२०० ते २१०० रुपयांपर्यंत भाव मिळाला, तर शेपूची १७३०० जुड्यांची आवक होऊन भाव ५०० ते १५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांदापातीची २१ हजार जुड्यांची आवक होऊन १००० ते १७०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

गिरणारे गावच्या टमाटा मार्केटमध्ये बाजारभाव कमालीचे घसरले असून, उत्पादन खर्च निघत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी टमाट्याच्या शेतात जनावरे सोडून देण्यास सुरुवात केली आहे. सध्या  उच्च प्रतीच्या टमाट्याला प्रति के्रट (२० किलो) ४० ते ६० रुपये भाव मिळत आहे. 

Web Title: In the Nashik market, the vegetables supply increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.