नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: पहिल्या फेरीत गोडसेंनी भुजबळांना ८ हजार ५८५ मतांनी टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:40 AM2019-05-23T10:40:48+5:302019-05-23T10:54:03+5:30

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून नाशिकमध्ये पहिल्या फेरीनंतर मतमोजणीत गोडसे यांनी भुजबळांना मागे टाकले आहे. पहिल्या फेरीनंतर ८ हजार ५८५ मतांनी गोडसे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना २५००५ मतं मिळाली असून भुजबळ यांच्या पारड्यात १६,४२० मतं पडली आहेत.

 Nashik Lok Sabha election results 2019: Nashik Lok Sabha Election 2019 live result & winner: Sameer Bhujbal VS Hemant Godse Votes & Results round one | नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: पहिल्या फेरीत गोडसेंनी भुजबळांना ८ हजार ५८५ मतांनी टाकले मागे

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: पहिल्या फेरीत गोडसेंनी भुजबळांना ८ हजार ५८५ मतांनी टाकले मागे

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्या फेरीनंतर ८ हजार ५८५ मतांनी गोडसे यांनी आघाडी घेतली भुजबळ यांच्या पारड्यात १६,४२० मतं

नाशिक : प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडविणार्या नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच खरी लढत असली तरी अपक्ष उमेदवार मानिकराव कोकाटे यांचा मतांचा फटका बसणार आहे. अपवाद वगळता या मतदारसंघात एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही. गेल्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे हे मोदी लाटेवर विराजमान झाले होते. त्यामुळे गोडसे यंदा विक्र म करतात की समीर भुजबळ, याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून नाशिकमध्ये पहिल्या फेरीनंतर मतमोजणीत गोडसे यांनी भुजबळांना मागे टाकले आहे. पहिल्या फेरीनंतर ८ हजार ५८५ मतांनी गोडसे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना २५००५ मतं मिळाली असून भुजबळ यांच्या पारड्यात १६,४२० मतं पडली आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना ४ लाख ९४ हजार ७३५ मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना ३ लाख ७ हजार ३९९ मतं मिळाली होती.





 




 

Web Title:  Nashik Lok Sabha election results 2019: Nashik Lok Sabha Election 2019 live result & winner: Sameer Bhujbal VS Hemant Godse Votes & Results round one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.