नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: बाराव्या फेरीनंतर गोडसे यांनी १ लाख २० हजार मतांनी भुजबळांना टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 05:08 PM2019-05-23T17:08:24+5:302019-05-23T17:08:52+5:30

नाशिकमध्ये नवव्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण २ लाख ८१ हजार ७८४ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. बाराव्या फेरीनंतर गोडसे यांनी १ लाख २० हजार ९५३ मतांनी आघाडी घेतली आहे. भुजबळ यांच्या पारड्यात १ लाख ६० हजार ८३१ मते पडली आहेत.

Nashik Lok Sabha election results 2019: Godse defeats Bhujbal with 1.25 lakh votes after 12th round | नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: बाराव्या फेरीनंतर गोडसे यांनी १ लाख २० हजार मतांनी भुजबळांना टाकले मागे

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: बाराव्या फेरीनंतर गोडसे यांनी १ लाख २० हजार मतांनी भुजबळांना टाकले मागे

Next
ठळक मुद्देभुजबळ यांच्या पारड्यात १ लाख ६० हजार ८३१ मते

नाशिक : प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडविणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच खरी लढत आहे. अपवाद वगळता या मतदारसंघात एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही. गेल्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे हे मोदी लाटेवर विराजमान झाले होते. त्यामुळे गोडसे यंदा विक्र म करतात की समीर भुजबळ, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे; मात्र मतमोजणीच्या चार फेºयाअखेर गोडसे यांनी घेतलेली आघाडी कायम आहे. त्यामुळे गोडसे विक्रम करणार असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून नाशिकमध्ये नवव्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण २ लाख ८१ हजार ७८४ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. बाराव्या फेरीनंतर गोडसे यांनी १ लाख २० हजार ९५३ मतांनी आघाडी घेतली आहे. भुजबळ यांच्या पारड्यात १ लाख ६० हजार ८३१ मते पडली आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना ४ लाख ९४ हजार ७३५ मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना ३ लाख ७ हजार ३९९ मतं मिळाली होती.

Web Title: Nashik Lok Sabha election results 2019: Godse defeats Bhujbal with 1.25 lakh votes after 12th round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.