नाशिकच्या के. के. वाघ तंत्रनिकेतनमध्ये 7 डिसेंबरपासून दोन दिवस राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 05:42 PM2017-12-02T17:42:07+5:302017-12-02T17:47:34+5:30

के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन तथा प्रकल्प स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून, शालेय विद्याथ्र्यामधील सुप्त वैज्ञानिक गुणांना या प्रदर्शनाच्या माध्यातून व्यासपीठ निर्माण झाले आहे.

Of Nashik K. State science science exhibition for two days from December 7 in Tiger Techniketan | नाशिकच्या के. के. वाघ तंत्रनिकेतनमध्ये 7 डिसेंबरपासून दोन दिवस राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन

नाशिकच्या के. के. वाघ तंत्रनिकेतनमध्ये 7 डिसेंबरपासून दोन दिवस राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन

Next
ठळक मुद्देदोनदिवसीय राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनदोन गटात होणार प्रकल्प स्पर्धा विद्यार्थ्यांमधील सुप्त वैज्ञानिक गुणांना प्रदर्शनाच्या माध्यातून व्यासपीठ

नाशिक : येथील के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयात  गुरुवारपासून (दि.7)   दोनदिवसीय राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन तथा प्रकल्प स्पर्धाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य पी. टी. कडवे व संस्थेचे सचिव के. एस. बंदी यांनी दिली. महाविद्यालयाने गेल्या 4 वर्षापूर्वी जिल्हास्तरावरून सुरू केलेल्या या उपक्रमाला राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले असून, शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त वैज्ञानिक गुणांना या प्रदर्शनाच्या माध्यातून व्यासपीठ निर्माण झाले आहे.
विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून घेण्यात येणारी प्रकल्प स्पर्धा दोन गटात होणार असून, पहिला अ गट शालेय विद्यार्थ्यांसाठी असून, यात आठवी ते दहावीचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकणार आहेत. तर अकरावी व बारावीचे विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयीन ब गटात सहभाग घेऊ शकणार आहेत. गटात हसत खेळत विज्ञान, भौतिक व रसायन शास्त्रतील मूलभूत सिद्धांतावर आधारित प्रयोग, जलसंवर्धन व सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, टाकाऊ उपयुक्त साहित्य निर्मिती, स्मार्ट व्हिलेज, स्मार्ट पार्किग, वैज्ञानिक खेळणी या विषयांवर विद्यार्थ्यांना प्रकल्प सादर करता येणार आहे. तर ब गटात कृषी उपयोगी अवजार निर्मिती व तंत्रज्ञान, शून्य कचरा निर्मिती, हरित तंत्रज्ञान, भविष्यातील ऊर्जास्त्रोत, कार्बन डाय ऑक्साईडचे वाढते प्रमाण-समस्या व उपाय, वाहतूक समस्या व उपाय, जुगाड शेती, मृदा संधारण या विषयांवर कनिष्ठ महाविद्यालयीन विद्याथ्र्याना त्यांचे प्रकल्प सादर करता येणार आहेत. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आयोजकांनी राज्यातील सुमारे साडेतीन हजाराहून अधिक शाळा, महाविद्यालयांना प्रत्यक्ष तथा पोस्टाद्वारे माहितीपत्र पाठविण्यात आले असून, स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका 5 डिसेंबर 2017 र्पयत के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयात अथवा महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर सादर करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी प्रा. प्रवीण भंडारी, प्रा. गणोश भंडारी, एम. एन. अहेर, प्रा. अशिष लांडे आदी उपस्थित होते.

Web Title: Of Nashik K. State science science exhibition for two days from December 7 in Tiger Techniketan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.