नाशिकमध्ये पतीने खलबत्त्याची मुसळी डोक्यात मारून पत्नीचा राहत्या घरात केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:21 PM2018-01-10T22:21:51+5:302018-01-10T22:23:16+5:30

यावेळी मुलगी धनश्री ही आपल्या खोलीमध्ये होती. यावेळी अण्णासाहेब याने घराचा दरवाजा व सर्व खिडक्या बंद केल्या. मद्यधुंद असलेल्या संशयित गायखे याने स्वयंपाकघरातून खलबत्त्याची लोखंडी मुसळी घेऊन पत्नी सवितावर हल्ला केला.

In Nashik, the husband killed his wife in the house and murdered his wife | नाशिकमध्ये पतीने खलबत्त्याची मुसळी डोक्यात मारून पत्नीचा राहत्या घरात केला खून

नाशिकमध्ये पतीने खलबत्त्याची मुसळी डोक्यात मारून पत्नीचा राहत्या घरात केला खून

Next
ठळक मुद्देसंतप्त झालेल्या गायखेने मुलगा अजिंक्य (२४) वर मुसळीने प्रहार केला. आईला वाचविण्यासाठी धाव घेतलेल्या मुला-मुलीवरही गायखे याने मुसळीने मारून त्यांना गंभीर जखमी केले.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अण्णासाहेब गायखे यास ताब्यात घेतले.

नाशिकरोड : जेलरोड शिवरामनगर येथील बंगल्यामध्ये बुधवारी (दि.१०) रात्रीच्या सुमारास गांधीनगर मुद्रणालय कामगार अण्णासाहेब निवृत्ती गायखे (५०) याने पत्नी सविता (४५)हिच्या डोक्यात मुसळीने मारून निर्घूण खून केला. यावेळी आईला वाचविण्यासाठी धाव घेतलेल्या मुला-मुलीवरही गायखे याने मुसळीने मारून त्यांना गंभीर जखमी केले.
जेलरोड शिवरामनगर येथील अपुर्वा क ॉलनीमध्ये राहणा-या बंगल्यात गायखे हे कुटुंबासमवेत राहत होते. बुधवारी रात्रीच्या सुमारास गायखे कुटुंबिय सर्व राहत्या घरात टिव्ही बघत होते. यावेळी मुलगी धनश्री ही आपल्या खोलीमध्ये होती. यावेळी अण्णासाहेब याने घराचा दरवाजा व सर्व खिडक्या बंद केल्या. मद्यधुंद असलेल्या संशयित गायखे याने स्वयंपाकघरातून खलबत्त्याची लोखंडी मुसळी घेऊन पत्नी सवितावर हल्ला केला. यावेळी झालेल्या आरडाओरडीमुळे मुला-मुलीने बैठक खोलीत धाव घेतली. संतप्त झालेल्या गायखेने मुलगा अजिंक्य (२४) वर मुसळीने प्रहार केला. दरम्यान, गायखेने मोर्चा धनश्री (२१)च्या दिशेने वळविल्यानंतर जखमी अवस्थेत अजिंक्य व आजुबाजूच्या नागरिकांनी तत्काळ गायखे यास ओढले. जवळच राहणाºया नातेवाईकांसह नागरिकांनी सदर घटनेची माहिती उपनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन बंगल्यातून अण्णासाहेब गायखे यास ताब्यात घेतले. जखमी मुलामुलींना नागरिकांनी त्वरित खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अजिंक्य हा गांधीनगर मुद्रणालयात आंतरवासिया म्हणून कार्यरत आहे. धनश्री ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. संशयित अण्णासाहेब हा पोलीस कर्मचाºयाचा भाऊ असल्याची चर्चा आहे. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

Web Title: In Nashik, the husband killed his wife in the house and murdered his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.