नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम १० टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 07:03 PM2019-05-20T19:03:11+5:302019-05-20T19:03:28+5:30

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा फक्त ८२ टक्केच पाऊस झाल्यामुळे नदी, नाले, धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. विशेषत: सिन्नर, चांदवड, नांदगाव, येवला या तालुक्यांकडे पावसाने वक्रदृष्टी केल्याने भर पावसाळ्यातही या तालुक्यांना पिण्याचे पाणी टॅँकरद्वारे पुरवावे लागले.

Nashik district has 10 percent water for dams | नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम १० टक्के पाणी

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम १० टक्के पाणी

Next
ठळक मुद्देजलसंकट : मान्सून लांबणीच्या शक्यतेने धसका

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. मे महिन्याच्या तिसºया आठवड्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम १० टक्केच साठा शिल्लक राहिला असून, हवामान खात्याने मान्सून लांबणीवर पडण्याचे संकेत दिल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जलसंकट उभे ठाकले आहे.


गेल्या वर्षी सरासरीपेक्षा फक्त ८२ टक्केच पाऊस झाल्यामुळे नदी, नाले, धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. विशेषत: सिन्नर, चांदवड, नांदगाव, येवला या तालुक्यांकडे पावसाने वक्रदृष्टी केल्याने भर पावसाळ्यातही या तालुक्यांना पिण्याचे पाणी टॅँकरद्वारे पुरवावे लागले. साधारणत: आॅक्टोबरपासूनच जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे दिसू लागत असताना डिसेंबरमध्ये टॅँकरची मागणी सुरू झाली. तत्पूर्वी नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील धरणांतील जलसाठ्याचे पाणी आरक्षण जाहीर करण्यात आले. मराठवाडा, नगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना, औद्योगिक वसाहत, रेल्वे यांसह सिंचनासाठी पाणी राखून ठेवण्यात आले. तथापि, यंदा धरणांमध्येच जेमतेम ७२ टक्के जलसाठा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागला होता. अशातच फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाचा कडाका वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात धरणाच्या पाण्याचे बाष्पिभवन होऊ लागले, त्यातच मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने धरणातून पाणी सोडावे लागल्याने मे महिन्याच्या तिसºया आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी १० टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातही आळंदी, पुणेगाव, भावली, वालदेवी, कडवा, भोजापूर, केळझर, नागासाक्या, माणिकपुंज ही नऊ धरणे कोरडीठाक पडली आहेत.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात सर्वाधिक म्हणजे २४ टक्के साठा असून, त्या खालोखाल चणकापूरमध्ये १९ टक्के, करंजवणला १७, पालखेडला १३, दारणा, गिरणा धरणात दहा टक्के साठा आहे. गंगापूर धरण समूहात १६ टक्के, पालखे ड समूहात १२ टक्के, दारणा समूहात ६ टक्के, गिरणा खोºयात १० टक्के पाणी साठा शिल्लक आहे.

Web Title: Nashik district has 10 percent water for dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.