नाशिक शहरात चक्क अवघे ४ हजार २९२ भाडेकरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 06:15 PM2017-10-25T18:15:46+5:302017-10-25T18:23:25+5:30

शहरातील तेरा पोलीस ठाण्यांपैकी सर्वाधिक भाडेकरू इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. इंदिरानगरमध्ये एकूण ८३८ भाडेकरूंची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. इंदिरानगरच्या हद्दीत असलेल्या पाथर्डी, पांडवनगरी, वडाळागाव, राजीवनगर आदि भागात मोठ्या संख्येने घरे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असून भाडेतत्वावर घरे घेणा र्‍याची संख्या अधिक

Nashik city has 4 thousand 292 house on lease! | नाशिक शहरात चक्क अवघे ४ हजार २९२ भाडेकरू !

नाशिक शहरात चक्क अवघे ४ हजार २९२ भाडेकरू !

Next
ठळक मुद्दे इंदिरानगरमध्ये एकूण ८३८ भाडेकरूंची पोलीस ठाण्यात नोंद जास्त भाडेकरुंची संख्या अंबड व सातपूर भागात असण्याची शक्यता भाडेकरूंचा प्रश्न व शहराच्या सुरक्षाव्यवस्थेला उद्भवणारा धोका याविषयीचा प्रश्न चव्हाट्यावर

नाशिक : शहरातील तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत भाडेकरुंची नोंद काही प्रमाणात करण्यात आली असून जानेवारीपासून तर अद्याप शहर व उपनगरीय भागात एकूण ४ हजार २९२ भाडेकरु अधिकृतपणे वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. सर्वात कमी भाडेकरू देवळाली कॅम्प परिसरात असून सर्वाधिक भाडेकरु इंदिरानगर परिसरात आहे.
शहरातील तेरा पोलीस ठाण्यांपैकी सर्वाधिक भाडेकरू इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. इंदिरानगरमध्ये एकूण ८३८ भाडेकरूंची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. इंदिरानगरच्या हद्दीत असलेल्या पाथर्डी, पांडवनगरी, वडाळागाव, राजीवनगर आदि भागात मोठ्या संख्येने घरे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असून भाडेतत्वावर घरे घेणा र्‍याची संख्या अधिक आहेत. इंदिरानगरमध्ये संख्या अधिक असली तरी त्याच्या तुलनेत जास्त भाडेकरुंची संख्या अंबड व सातपूर भागात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात औद्योगिक वसाहत असल्यामुळे कामगार वर्ग मोठ्या संख्येने येथे वास्तव्यास असून परप्रांतीय लोकांचीदेखील संख्या अधिक आहे. या भागातील पोलीस ठाण्यांच्या अधिकाºयांनीदेखील परिसरातील भाडेकरुंची माहिती मागवून त्याची नोंद करुन घेण्यासाठी मोहिम सुरू करण्याची गरज आहे.



...तर भाडेतत्वाचा व्यवहार ‘धोक्याचा’
काही दिवसांपूर्वी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी फाटा परिसरातील ‘पार्वती’च्या सदनिकेत अहमदनगरचे कुख्यात गुंड शार्पशूटर वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी उघड केले. तब्बल १८ महिन्यांपासून त्यांचे या भागात वास्तव्य होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या गुंडांना ज्या घरमालकाने भाडेतत्त्वावर घर दिले त्याने कुठलीही माहिती यासंदर्भात पोलिसांना दिलेली नव्हती. यामुळे पोलिसांनी त्याच्यासह एजंटवरही गुन्हा दाखल केला आहे. एकूणच या घटनेपासून पुन्हा शहरात अनधिकृतपणे वास्तव्य करणार्‍या भाडेकरूंचा प्रश्न व शहराच्या सुरक्षाव्यवस्थेला उद्भवणारा धोका याविषयीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.


नोंदणी सुलभतेच्या दिशेने पाऊल
पोलीस प्रशासनानेदेखील सदर प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन भाडेतत्त्वाची पोलीस ठाण्यातील नोंदणीप्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकले आहे. भाडेतत्त्वाच्या मुद्रांक करारपत्राच्या नोंदणीकरिता असलेली अट शिथिल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिली आहे. करारपत्राचा खर्च करण्याची जबाबदारी घरमालकाची की भाडेकरूंची यावरून होणारा वाद व त्यामुळे पोलिसांकडे नोंदणीबाबत केली जाणारी टाळाटाळ लक्षात घेता सिंगल यांनी सदर अट शिथिल करून सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकार्‍याना तशी लेखी सूचनाही काढली आहे. यामुळे निश्चितच नोंदणीच्या आकडेवारीमध्ये नजीकच्या काळात वाढ हाईल, असा विश्वास पोलिसांना आहे.

Web Title: Nashik city has 4 thousand 292 house on lease!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.