घंटागाडीद्वारे कचरा संकलनास प्रारंभ नांदगाव : स्वच्छतेसाठी असलेल्या उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 10:25 PM2017-11-19T22:25:53+5:302017-11-19T22:29:25+5:30

नांदगाव : शहरातील कचरा संकलन करून घंटागाडीद्वारे घनकचरा डेपोवर वाहून नेणे या कामाचा उद्घाटन समारंभ आज शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेश कवडे होते.

 Nandgaon: Appeal to respond to the cleanliness program | घंटागाडीद्वारे कचरा संकलनास प्रारंभ नांदगाव : स्वच्छतेसाठी असलेल्या उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे आवाहन

घंटागाडीद्वारे कचरा संकलनास प्रारंभ नांदगाव : स्वच्छतेसाठी असलेल्या उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्दे नांदगाव : स्वच्छतेसाठी असलेल्या उपक्रमाला प्रतिसाद घंटागाडीद्वारे कचरा संकलनास प्रारंभ

नांदगाव : शहरातील कचरा संकलन करून घंटागाडीद्वारे घनकचरा डेपोवर वाहून नेणे या कामाचा उद्घाटन समारंभ आज शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेश कवडे होते.
प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी सुहास कांदे म्हणाले, पहिले घर स्वच्छ करा. आरोग्य राखा. रोगराई दूर करा. नगराध्यक्ष राजेश कवडे चांगले काम करत आहेत. त्यांनी गेल्या वर्षभरात कामांचा रोडमॅप तयार केला आहे. शिवसेना व भाजपा या आमच्या सरकारच्या माध्यमातून शहराच्या अनेक समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. घनकचरा व्यवस्थापनाला नागरिकांनी सहकार्य करावे. ओला व सुका कचरा वेगवेगळा करून द्यावा. काही दिवस आधी ग्रामविकासमंत्री दादा भुसे यांच्या आढावा बैठकीत प्रशासन व लोकप्रतिनिधी यात समन्वय नाही हा संदेश दिला गेला. तसे पुन्हा होऊ नये. लोकप्रतिनिधींना जनता कामे करण्यासाठी निवडून देते. त्याचा विचार करून प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहन कांदे यांनी केले.
ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे म्हणाले की, सुधारणा करून २० दिवसांनी होणारा पाणीपुरवठा पाच ते सात दिवसांवर नगराध्यक्षांनी आणला. प्रास्ताविकात मुख्याधिकारी यांनी कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प राबविला जात आहे, अशी माहिती दिली.
उपनगराध्यक्ष शोभाताई कासलीवाल, कुदरतअली शहा, महावीर जाधव, सचिन साळवे, दीपक बंगाळे, किरण देवरे, मनीषा काकळीज, सुनंदा पवार, संगीता जगताप, कारभारी भीमा शिंदे, वाल्मीक टिळेकर, किरण देवरे, नितीन जाधव, बालेमिया शेख, सुरज पाटील, अभिषक सोनवणे, महावीर पारख, विनता पाटील, वंदना कवडे, चांदणी खरोटे, सविता शेवरे, योगिता गुप्ता, कामिनी साळवे, सुनंदा पवार, नंदा कासलीवाल, सुनील ढासे, प्रकाश कायस्थ, गणेश पाटील, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महिरे यांनी केले.
 

 

 

Web Title:  Nandgaon: Appeal to respond to the cleanliness program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.