देशमुख महाविद्यालयाने जिंकली म्यूट ट्रायल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:55 AM2019-01-21T00:55:40+5:302019-01-21T00:55:56+5:30

शहरातील एनबीटी विधी महाविद्यालयात घेण्यात आलेली तेरावी म्यूट ट्रायल अ‍ॅण्ड जजमेंट रायटिंग स्पर्धा अमरावतीच्या पंजाबराव देशमुख महाविद्यालयाने जिंकली आहे. तर नाशिकमधील मविप्र विधी महाविद्यालयाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

 Mute Trial Competition won by Deshmukh College | देशमुख महाविद्यालयाने जिंकली म्यूट ट्रायल स्पर्धा

देशमुख महाविद्यालयाने जिंकली म्यूट ट्रायल स्पर्धा

Next

नाशिक : शहरातील एनबीटी विधी महाविद्यालयात घेण्यात आलेली तेरावी म्यूट ट्रायल अ‍ॅण्ड जजमेंट रायटिंग स्पर्धा अमरावतीच्या पंजाबराव देशमुख महाविद्यालयाने जिंकली आहे. तर नाशिकमधील मविप्र विधी महाविद्यालयाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
एनबीटी विधी महाविद्यालय व डी. टी. जायभावे प्रतिष्ठान यांच्यातर्फे एनबीटी महाविद्यालयात संयुक्तरीत्या तेराव्या राष्टस्तरीय म्यूट ट्रायल व जजमेंट रायटिंग स्पर्धेचा रविवारी (दि.१३) समारोप झाला असून, या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरणही करण्यात झाले. या स्पर्धेत अमरावतीच्या पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला असून, या संघात अभिषेक चव्हाण, विशाखा सोनटक्के आणि अभिजित खोत यांचा समावेश होता.
यातील अभिजित खोत यांनी सर्वोकृष्ट निकाल लेखणाचे पारितोषिक पटकावले, तर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या मविप्र विधी महाविद्यालयाच्या संघात ऋषिकेश पानसरे, आनंद नेटावटे आणि श्रीलेखा भागवत यांचा समावेश होता. विजेत्या स्पर्धकांना प्राचार्य डॉ. एम. एस. गोसावी, जिल्हा न्यायधीश एस. सी. खाटी, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ प्रतिनिधी राजीव पाटील, प्रसाद पाटील, अ‍ॅड. जयंत जायभावे आणि अ‍ॅड. नितीन ठाकरे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या स्पर्धेत एकूण विविध महाविद्यालयांच्या ३० संघांमधून १८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील केरळ, तामिळनाडू, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आदी राज्यांमधून आलेल्या १६ संघांचा समावेश होता.
वैयक्तिक पुरस्कार
सर्वोकृष्ट निकालपत्र लेखन - अभिजित खोत
सर्वोत्कृष्ट मेमोरियल पुरस्कार - सूरज एस. गुंड
सर्वोत्कृष्ट साक्षीदार परीक्षा - अभिषेक चौहान
सर्वोत्कृष्ट उलटतपासणी - विशाखा सोनटक्के,
सर्वोत्कृष्ट युक्तिवाद -
आनंद राठोड
सर्वोकृष्ट महिला वकील - धुविजा शाह
सर्वोकृष्ट पुरुष वकील -
नवनीत डोगरा
सर्वोत्कृष्ट साक्षीदार पुरस्कार - राधिका पुरोहित, दिपेश सक्सेना, प्रतीक्ष बंभेरू, आकाश जाधव
सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार - निशांत बर्डिया, हनी नारायणी, महेश गायकवाड, वैभव वाकचौरे

Web Title:  Mute Trial Competition won by Deshmukh College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.