मनपाच्या बससेवेला ‘डबलबेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:39 AM2017-12-27T00:39:32+5:302017-12-27T00:39:54+5:30

शहराला स्मार्ट सिटी करण्याकरिता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या नाशिक शहर बस वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने ही सेवा ताब्यात घ्यावी त्यासाठी राज्य सरकार पाठबळ देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे महापालिकेला हिरवा कंदील मिळाला आहे. त्याचबरोबर नाशिक शहराला आकार देण्याचे काम विकासकच करू शकतात, शहरातील गरिबांना घरे देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन करतानाच बांधकाम नियंत्रण व नियमन नियमावलीत (डीसीपीआर) मधील अडचणी दूर करण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक बोलवून विकासकांचा प्रश्न सोडविण्याची हमीही त्यांनी दिली आहे.

 Mumba's bus service 'double-bar' | मनपाच्या बससेवेला ‘डबलबेल’

मनपाच्या बससेवेला ‘डबलबेल’

Next

नाशिक : शहराला स्मार्ट सिटी करण्याकरिता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या नाशिक शहर बस वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने ही सेवा ताब्यात घ्यावी त्यासाठी राज्य सरकार पाठबळ देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे महापालिकेला हिरवा कंदील मिळाला आहे. त्याचबरोबर नाशिक शहराला आकार देण्याचे काम विकासकच करू शकतात, शहरातील गरिबांना घरे देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन करतानाच बांधकाम नियंत्रण व नियमन नियमावलीत (डीसीपीआर) मधील अडचणी दूर करण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक बोलवून विकासकांचा प्रश्न सोडविण्याची हमीही त्यांनी दिली आहे.  बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संस्थेच्या वतीने गृहस्वप्नपूर्तीसाठी आयोजित केलेल्या शेल्टर २०१७ या प्रदर्शनाचा समारोप मंगळवारी (दि. २६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डोंगरे मैदानात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश महाजन, तसेच आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे व सीमा हिरे, डॉ. राहुल अहेर, महापौर रंजना भानसी, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण तसेच क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल, क्रेडाईचे माजी राज्य अध्यक्ष अनंत राजेगावकर व शेल्टरचे मुख्य समन्वयक उदय घुगे उपस्थित होते.
नाशिक शहर आपण दत्तक घेतले आहे, त्याचे स्मरण करून देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे शहर स्मार्ट कसे करता येईल यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यासह जे कोणी चांगले प्रस्ताव आणतील ते सर्व प्रस्ताव राज्य सरकार सकारात्मक पद्धतीने मंजूर केले जातील, असे प्रारंभीच स्पष्ट केले. नाशिक शहरात सध्या बससेवेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिवहन महामंडळ बससेवा चालविण्यास तयार नाही. नाशिक महापालिकेने ही बससेवा चालविण्याची तयारी केली असली तरी त्यासाठी अनेक अडचणी आहेत. परंतु शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्य शासन महापालिकेला पाठबळ देईल यासंदर्भात लवकरच मुंबईत बैठक घेतली जाईल, असेही ते म्हणाले. बससेवेसाठी अनेक नवे मॉडेल असून लीज लाइनवरही बस घेता येतील आणि त्यामाध्यमातून शहराची वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  नाशिक शहराला ऐतिहासिक परंपरा आहे. विकासाला अत्यंत अनुकूल वातावरण असून, डेव्हलपरच शहरातील नाशिकला आकार देऊ शकतील, असा विश्वास व्यक्त केला 
परवडणारी घरे करा 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याची तयारी केली असून, त्याअंतर्गतच महाराष्टÑाच्या ग्रामीण भागात साडेबारा लाख आणि शहरी भागात दहा लाख घरे बांधण्यात येणार आहे. सोलापूर येथे त्याअंतर्गत तीस हजार घरे बांधण्यात येणार असून, नागपूरला दहा हजार घरांचे काम करण्यात येणार आहे. नाशिक शहरातदेखील अशाप्रकारची कामे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुरू करण्याचे शिवधनुष्य विकासकांनी पेलावे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांचा स्टॉक तयार होऊ शकेल आणि गरजूंना परवडेल अशा पद्धतीने घरे उपलब्ध होऊ शकतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 
शहरात वायफाय हब 
नाशिक शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आला असून, शहराला खºया अर्थाने स्मार्ट करण्यासाठी कल्पक विकासक योगदान देऊ शकतात असे सांगून मुख्यमंत्र्यांनी शहरात सीसीटीव्ही बसविण्याचा मागे पडलेला विषय मार्गी लावण्यात येईल तसेच वायफाय हब तयार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title:  Mumba's bus service 'double-bar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.