मुखेड-महालखेडा रस्ता दुरु स्ती काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 02:55 PM2018-10-18T14:55:02+5:302018-10-18T14:55:28+5:30

मुखेड : येवला तालुक्यातील मुखेड-महालखेडा रस्ता दुरु स्ती काम रखडले आहे. अवघ्या एक किलोमिटर अंतराच्या रस्त्याच्या दुरु स्ती काम गेल्या वर्षभरापासून चालु असून ते अदयापही पूर्ण होत नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

 The Mukhed-Mahalkheda road was closed for repair work | मुखेड-महालखेडा रस्ता दुरु स्ती काम रखडले

मुखेड महालखेडा रोडवर पसरलेली खडी .

Next
ठळक मुद्देखडी मुळे शिवार वाहतुक करतांना अनेक शेतकº्यांच्या गाडी बैलांना अपघात झाले . अनेक वाहनचालकांना ही गंभीर दुखापती झाल्या .


मुखेड : येवला तालुक्यातील मुखेड-महालखेडा रस्ता दुरु स्ती काम रखडले आहे. अवघ्या एक किलोमिटर अंतराच्या रस्त्याच्या दुरु स्ती काम गेल्या वर्षभरापासून चालु असून ते अदयापही पूर्ण होत नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. महालखेडा ( भवानी देवी मार्ग ) हा रस्ता अवघा पाच कि लोमिटर अंतराचा रस्ता असून गेल्या पंधरा वर्षापासून या रस्त्याचे दुरु स्ती काम अपूर्णावस्थेत आहे . चार किमी दुरु स्ती काम पूर्ण झाले आहे . शेवटच्या एक किमी चे दुरु स्ती काम मागील वर्षी सुरु झाले . ते अद्यापही पूर्ण झाले नाही. संबंध एक किमी अंतराच्या रस्त्यावर खडीचा दाट थर पसरलेला आहे . टोकदार खडी मुळे या रस त्या वरून पायी चालनेही वेदनादायी होते. शासनाच्या नियमानुसार दुरु स्ती कामाच्या खर्चासंदर्भात वर्क आॅर्डरचा बोर्डलावलेला नाही . या रस्त्याचा दुतर्फा बाभळींचे साम्राज्य निर्माणझाले असून त्याचाही रहदारीला अडथळा होत आहे . किमान पाच- सहा वर्षातुन तरी रस्ता दुरु स्ती होणे गरजेचे आहे , अशी मागणी मुखेड व महालखेडा ग्रामस्थांकडुन केली जात आहे.
......
 

Web Title:  The Mukhed-Mahalkheda road was closed for repair work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.