दुकानात घुसून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:43 PM2018-06-26T22:43:49+5:302018-06-26T22:45:36+5:30

चांदवड : येथील नगर परिषदेच्या वतीने सोमवारी (दि. २५) चांदवड नगर परिषदेमार्फतप्लॅस्टिकबंदीची मोहीम हाती घेण्यात आली. सदर मोहिमेत चांदवड शहरातील पाच प्लॅस्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या घटनेचा व्यापारी असोसिएशनने निषेध नोंदविला असून, पूर्वसूचना न दिल्याने व दुकानात घुसून कारवाई करण्याचा नगर परिषदेला अधिकार आहे का? असा सवाल व्यापारी असोसिएशनने केला.

Moving into the shop | दुकानात घुसून कारवाई

दुकानात घुसून कारवाई

Next
ठळक मुद्देप्लॅस्टिकबंदी : नगर परिषदेत बैठक; पूर्वसूचना न दिल्याने व्यापारी संतप्त

चांदवड : येथील नगर परिषदेच्या वतीने सोमवारी (दि. २५) चांदवड नगर परिषदेमार्फतप्लॅस्टिकबंदीची मोहीम हाती घेण्यात आली. सदर मोहिमेत चांदवड शहरातील पाच प्लॅस्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या घटनेचा व्यापारी असोसिएशनने निषेध नोंदविला असून, पूर्वसूचना न दिल्याने व दुकानात घुसून कारवाई करण्याचा नगर परिषदेला अधिकार आहे का? असा सवाल व्यापारी असोसिएशनने केला.
या पार्श्वभूमीवर चांदवड नगर परिषदेने व्यापारीवर्गाची मंगळवारी (दि. २६) सकाळी अकरा वाजता बैठक बोलवली होती. या बैठकीची पूर्वसूचनाही दिली नव्हती. येथील दत्तात्रय रामभाऊ बोरसे, संतोष रामूलाल अग्रवाल, भाटगावकर हार्डवेअर, व्ही. कुमार जनरल स्टोअर्स, अजित जनरल स्टोअर्स यांच्यावर सदर कारवाई ही नगर परिषदेने नेमलेल्या पथकामधील नगर परिषद अभियंता सत्यवान गायकवाड, यशवंत बनकर, मुकादम, अनिल गायकवाड, मच्छिंद्र जाधव, बनू धोतरे, सागर पवार, संतोष कापसे, सुनील गायकवाड, खंडू वानखेडे, वाल्मीक सकट यांनी केली तर पाचही व्यापाºयांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये असा एकूण पंचवीस हजारांचा दंड वसूल केला आहे.
पथकातील अधिकाºयांकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नव्हते. ते दुकानात घुसून वाटेल ती कपाटे उघडून वस्तू तपासत होते, असा अधिकार त्यांना आहे का ? असा संतप्त सवाल व्यापाºयांनी करून पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्याच्या विचारात काही व्यापारी आहेत. मंगळवारी (दि. २६) दुपारी बारा वाजले तरी मुख्याधिकारी अभिजित कदम व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष उपस्थित नव्हते. यामुळे सकाळी अकरा वाजेपासून आलेले व्यापारी संतप्त झाले. त्यांनी बैठकीस न बसण्याचा निर्णय घेतला व बैठकीस अधिकारीच नसल्याने आम्ही परत जात आहोत असे पत्र त्यावेळी तयार करीत असतानाच दुपारी बारा वाजेच्या सुमारास मु्ख्याधिकारी कदम यांचे आगमन झाले. त्यांनी शिक्षक मतदारसंघ निवडणूक व प्रकृतीचे कारण दाखवित बैठकीस उशीर झाल्याने दिलगिरी व्यक्त केली. यावेळी नगराध्यक्ष रेखा गवळी, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, मुख्याधिकारी अभिजित कदम, नगरसेवक मीनाताई कोतवाल, अशपाक खान, अल्ताफ तांबोळी, इंदूबाई वाघ, लीलाबाई कोतवाल उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी सर्व व्यापारी बंधूंना सहकार्य करण्याचे आवाहन केले. व्यापारी संतप्त झाले. यापूर्वी व्यापाºयांना वैयक्तिक स्वरूपात नोटीस अथवा दवंडी दिली नाही. कॅरिबॅग, प्लॅस्टिक बॅग विक्री करताना कार्यवाही केली असती तर ती मान्य असती; परंतु असलेला स्टॉक दुकानात असून, त्यावर कार्यवाही का केली? ज्या व्यापाºयांकडून दंड वसूल केला तो परत करावा, अशी मागणी व्यापारीवर्गाने केली. यावेळी नगर परिषदेचे सभागृह व्यापाºयांच्या गर्दीने भरले होते. यापुढे व्यापारीवर्गावर जबरदस्तीने कार्यवाही केल्यास चांदवड शहर बंद, आंदोलन छेडू असा इशारा व्यापारी युनियनने यावेळी दिला. मुख्याधिकारी कदम यांनी याबाबत माहिती घेऊन कळवितो असे त्यांनी सांगीतले.
यावेळी व्यापारी प्रकाश आबड, भूषण आबड, राहुल आबड, कल्पेश संकलेचा, धीरज संकलेचा, अजित तिल्लोडा, सुनील लुनावत, विकास जाधव, धमेंद्र लोढा, गणेश खैरनार, गुड्डू खैरनार, नीलेश आचलिया, मयूर बाफना, मोनू पलोड, रेवन बिल्लाडे, बाळासाहेब वाघ, नितीन थोरे, बाळासाहेब शेळके आदी यावेळी उपस्थित होते. येत्या शुक्रवारपर्यंत दंडाच्या रकमेवर विचार करू, असे व्यापाºयांना सांगण्यात आले.दुकानातील बºयाच वस्तूंना प्लॅस्टिकचे आवरणदुकानातील बºयाच वस्तूंना प्लॅस्टिकचे आवरण असून, ते काढले तर त्या वस्तू खराब होतील त्यांचे काय ? प्लॅस्टिक कारखाने आधी बंद करा व नंतरच व्यापाºयांकडून दंड घ्या, असा संतप्त सवाल व्यापाºयांनी केला तर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या खुर्चीला चक्क प्लॅस्टिक असल्याने व बºयाच कपाटांमध्ये प्लॅस्टिक कॅरिबॅग असल्याने यांच्यावर आपण काय कारवाई करणार, असा संतप्त सवाल व्यापाºयांनी केला.

Web Title: Moving into the shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार