हगणदारीमुक्तीसाठी कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:24 PM2019-01-14T23:24:40+5:302019-01-15T00:33:47+5:30

नाशिक : आदिवासी भागात वन संपदेचे जतन करणाºया दिंडोरी तालुक्यातील शृंगारपाडा येथे राज्यपाल भेट देणार असल्याचे ग्रामस्थांना सांगून गाव ...

Mortgage Loan | हगणदारीमुक्तीसाठी कर्ज

हगणदारीमुक्तीसाठी कर्ज

googlenewsNext
ठळक मुद्देशृंगारपाडा : अनुदान देण्यास अधिकाऱ्यांचे कानावर हात

नाशिक : आदिवासी भागात वन संपदेचे जतन करणाºया दिंडोरी तालुक्यातील शृंगारपाडा येथे राज्यपाल भेट देणार असल्याचे ग्रामस्थांना सांगून गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी उधार, उसनवार करून त्यांना स्वखर्चाने शौचालय बांधण्यास प्रवृत्त करणाºया प्रशासनातील अधिकाºयांमुळे गावावर गेल्या दोन वर्षांपासून पाच लाखांचे कर्ज झाले आहे. शौचालय उभारणीसाठी साहित्य उधारीवर देणाºया व्यावसायिकांकडून वसुली साठी तगादा लावला जात आहे, काही ग्रामस्थांच्या वस्तू जप्तीची कारवाईही करण्यात आली आहे. तथापि, प्रशासनातील अधिकाºयांनी मात्र शौचालयाचे अनुदान देण्याबाबत कानावर हात ठेवला आहे.
राज्यपाल वनजमिनींच्या सामूहिक दाव्यांची पाहणी करण्यासाठी दिंडोरी तालुक्यात भेट देणार असल्यामुळे वन संपदेचे रक्षण करणाºया शृंगारपाडा या गावाची प्रशासनातील अधिकाºयांनी निवड केली. त्यासाठी गावात शासकीय अधिकाºयांची रेलचेल वाढल्यावर राज्यपालांना आश्चर्याचा धक्का देण्यासाठी शृंगारपाडा हे संपूर्ण गावच हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनातील अधिकाºयांनी ग्रामस्थांची मनधरणी करून त्यांना प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी गळ घातली. ग्रामस्थांनीही शासनाच्या या योजनेत सहभागी होण्यासाठी तयारी दर्शविली तथापि, शासनाकडे शौचालय अनुदान देण्यासाठी निधी नसल्याचे पाहून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ग्रामस्थांना उधार, उसनवारी करण्याचा सल्ला दिला व शासनाचे पैसे मिळताच तत्काळ निधी वितरित करण्याचे आश्वासन दिले. वरिष्ठ अधिकाºयांच्या शब्दाखातर ग्रामस्थांनी एकत्र येत सीमेंट, वाळू, पत्रे, शौचालयाचे भांडे अशा विविध वस्तू उधार, उसनवारी करून आणल्या व संपूर्ण गावातील प्रत्येकी १०५ घरे हगणदारीमुक्त केले. गाव हगणदारीमुक्त झाल्याची आकडेवारी सरकार दप्तरी नोंद करण्यात आली. राज्यपाल येणार म्हणून शासनाच्या अधिकाºयांनी शृंगारपाडा या संपूर्ण गावाला एक सारखा रंग देऊन आदर्श गाव निर्माण करण्यासाठी संपूर्ण गावाला शासकीय रंग पुरविला. तथापि, ग्रामस्थांनी आपली खरी वस्तुस्थिती राज्यपालांना कळावी म्हणून रंगरंगोटी करण्यास नकार दिला. दुर्दैवाने राज्यपालांचा दौरा रद्द झाला. त्यानंतर सरकारी अधिकाºयांनी या गावाकडे पाठ फिरविली. आज दोन वर्षे उलटूनही शृंगारपाडा ग्रामस्थांना शौचालयाचे अनुदान मिळालेले नाही. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले जात असून, आश्वासनापलीकडे त्यांना काहीच मिळालेले नाही. दुसरीकडे उसनवार दिलेल्या वस्तूंचे पैसे मिळत नसल्याने व्यावसायिकांकडून ग्रामस्थांचा छळ केला जात आहे.

Web Title: Mortgage Loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार