घरात घूसून नारळ विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 02:03 PM2018-12-10T14:03:14+5:302018-12-10T14:08:44+5:30

इंदिरानगर : वडळागावातील महेबुबनगर भागातील नारळ विक्रेत्यांच्या गल्ली क्रमांक ७मध्ये राहणाऱ्या शफीउल्लाह अताउल्ला शेख (३८) यांच्या राहत्या घरात घुसून ...

Mortar attack on coconut smoker in house | घरात घूसून नारळ विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला

घरात घूसून नारळ विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देशेख यांच्यासह कुटुंबियांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू गुन्हेगार मोकाट तरी पोलिसांना लागेना शोधहल्ला करणारे हे संशयित गुन्हेगार रविवारपासून फरार

इंदिरानगर : वडळागावातील महेबुबनगर भागातील नारळ विक्रेत्यांच्या गल्ली क्रमांक ७मध्ये राहणाऱ्या शफीउल्लाह अताउल्ला शेख (३८) यांच्या राहत्या घरात घुसून शेख यास लोखंडी गजने मारहाण करत त्यांच्या पत्नी यास्मीन, मुलगी मोहसिना व दोन लहान मुलांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शेख यांच्यासह कुटुंबियांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंदिरानगर पोलिसांनी संशयित सराईत गुन्हेगार बंटी शेख, शौकत सुपडु शहा, जावेद शहा, आसिफ मेडिकलवाला (पुर्ण नाव माहित नाही), गोल्डी यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नारळ विक्री करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणा-या शेख यांना सराईत गुन्हेगार संशयित बंटी, शौकत उर्फ शौक्या, गोल्डी व जावेद शहा, आसिफ यांनी राहत्या घरात प्रवेश करुन रविवारी (दि.९) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जबर मारहाण केली. या मारहाणीच्या गुन्ह्यात तीघा सराईत गुन्हेगारांचा समावेश असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. घरात घुसून हल्ला करणारे हे संशयित गुन्हेगार रविवारपासून फरार झाले आहेत. त्यांचा इंदिरानगर पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. संशयितांवर यापुर्वीदेखील असे मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. बंटी, शौक्या यांनी सुमारे महिनाभरापुर्वी खंडेराव चौकात फायटर व लोखंडी रॉडने एका युवकावर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. नारळविक्रेता घरी आल्यानंतर संशयितांनी त्याला घरात जाऊन मारहाण केली. गोल्डी याने लोखंडी गज डोक्यावर व पाठीत मारला त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात शेख कोसळला आणि आसिफ याने गळा आवळण्याचा प्रयत्न क रत अन्य दोघांनी त्यांच्या पत्नी, मुलामुलींना मारहाण केल्याचे फिर्यादीत शेख याने फिर्यादीत म्हटले आहे. जखमी अवस्थेत शेजारी राहणाºया रिक्षाचालकाने शेखसह कटुंबियांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

गुन्हेगार मोकाट तरी पोलिसांना लागेना शोध
या संशयित गुन्हेगारांवर विविधप्रकारचे गुन्हे दाखल असूनदेखील पोलिसांकडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या गुन्हेगारांनी वडाळागाव परिसरात दहशत माजविली आहे.पोलिसांकडून त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई का केली जात नाही? असा संतप्त सवाल गावकºयांनी उपस्थित केला आहे. हे संशयित पोलिासांच्या अद्याप हाती लागलेले नाही. गुन्हेकरून हे फरार होतात व पुन्हागावात गुन्हे करतात तरीदेखील पोलिसांना हे मिळून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

Web Title: Mortar attack on coconut smoker in house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.