आचारसंहितेचा फटका मोदी यांच्या भाषणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:47 AM2018-04-22T00:47:09+5:302018-04-22T00:47:09+5:30

Modi's speech shocked Modi's speech | आचारसंहितेचा फटका मोदी यांच्या भाषणाला

आचारसंहितेचा फटका मोदी यांच्या भाषणाला

Next

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून, त्याचा पहिला फटका थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणालाच बसला आहे. केंद्रीय नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांचे भाषण व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांसाठी प्रसारित करण्यात येणार होते; परंतु आचारसंहिता सुरू असल्याने ऐनवेळी मोदी यांचे भाषण प्रसारित न करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानंतर जिल्ह्यात आचार-संहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून, लोकप्रतिनिधींकडील वाहने जमा करण्यात आली आहेत तसेच मंत्र्यांचे दौरे व शासकीय बैठकाही स्थगित करण्यात आले असून, राजकीय पक्षांच्या जाहीर प्रचार,  मेळावे, बैठकांना आता परवानगी घ्यावी लागणार आहे. शनिवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी आचारसंहितेची माहिती दिली. तत्पूर्वी केंद्र सरकारने दि. २१ एप्रिल हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून जाहीर केला असल्याने त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील शासकीय अधिकाºयांना मार्गदर्शन करणार असल्याचे राज्याच्या प्रधान सचिवांनी सर्व जिल्हाधिकाºयांना त्याबाबतचे पत्र पाठवून प्रत्येक जिल्ह्णातील सर्व शासकीय अधिकाºयांनी थेट प्रक्षेपणाद्वारे या भाषणाचा लाभ घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार नाशिक जिल्ह्णातील सर्व महसूल अधिकाºयांना दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या होत्या. मोदी यांचे मार्गदर्शनपर भाषण थेट प्रोजेक्टरवर प्रसारित करण्यात येणार असल्याने त्यानिमित्ताने सर्व अधिकारी शनिवारी हजर झाले व प्रक्षेपणाची संपूर्ण तयारीही करण्यात आली. मोदी यांचे भाषण सुरू होण्याच्या काही कालावधी पूर्वीच जिल्ह्णातील आदर्श आचारसंहितेचा मुद्दा चर्चिला गेला. महसूल अधिकाºयांवर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीची तसेच आचारसंहिता अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याने मोदी यांचे मार्गदर्शनपर भाषणातून या अधिकाºयांवर प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली व त्यातून आचारसंहिता भंग होण्याचा मुद्दा पुढे आल्याने ऐनवेळी जिल्हाधिकाºयांनी मोदी यांचे थेट प्रक्षेपण बंद करण्याची सूचना केली व सर्व अधिकारी पुन्हा माघारी परतले.
शनिवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी आचारसंहितेची माहिती दिली. तत्पूर्वी केंद्र सरकारने दि. २१ एप्रिल हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून जाहीर केला असल्याने त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील शासकीय अधिकाºयांना मार्गदर्शन करणार असल्याचे राज्याच्या प्रधान सचिवांनी सर्व जिल्हाधिकाºयांना त्याबाबतचे पत्र पाठवून प्रत्येक जिल्ह्णातील सर्व शासकीय अधिकाºयांनी  थेट प्रक्षेपणाद्वारे या भाषणाचा लाभ घेण्याची सूचना केली होती.

Web Title: Modi's speech shocked Modi's speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.