देवळालीत सेवानिवृत्त लष्करी अधिकाºयाकडून मोबाइल चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:39 AM2018-02-25T00:39:37+5:302018-02-25T00:39:37+5:30

पंजाब राज्यातील पटियाला येथील प्रशिक्षणार्थी जवान बोफोर्स तोफेचे प्रशिक्षण घेण्यासाठी देवळाली छावणीमधील तोफखाना केंद्रात दाखल झाले होते. त्यांच्या राहत्या शासकीय निवासस्थानातून मोबाइल चोरी करणाºया एका संशयित सेवानिवृत्त लष्करी अधिकाºयाला बंदोबस्तावर असलेल्या लष्करी शिपायाने रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे.

Mobile theft from retired army officer Deolali | देवळालीत सेवानिवृत्त लष्करी अधिकाºयाकडून मोबाइल चोरी

देवळालीत सेवानिवृत्त लष्करी अधिकाºयाकडून मोबाइल चोरी

Next

नाशिक : पंजाब राज्यातील पटियाला येथील प्रशिक्षणार्थी जवान बोफोर्स तोफेचे प्रशिक्षण घेण्यासाठी देवळाली छावणीमधील तोफखाना केंद्रात दाखल झाले होते. त्यांच्या राहत्या शासकीय निवासस्थानातून मोबाइल चोरी करणाºया एका संशयित सेवानिवृत्त लष्करी अधिकाºयाला बंदोबस्तावर असलेल्या लष्करी शिपायाने रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे.  याबाबत देवळाली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पटियाला येथून बोफोर्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी ८ तारखेला दाखल झालेले भूदलाचे शिपाई श्याम बाबू रामरक्षपाल राजपूत (२६) हे दाखल झाले होते. ते शनिवारी (दि.२४) सकाळी दैनंदिन वेळापत्रकानुसार गोळीबार मैदानावर बोफोर्स प्रशिक्षणासाठी सहकाºयांसमवेत विद्यार्थी निवासस्थानामधून बाहेर पडले. दुपारी प्रशिक्षण आटोपून निवासस्थानावर आले असता त्यांनी चार्जिंगला ठेवलेला मोबाइल चोरी झाल्याचे लक्षात आले तसेच निवासस्थानाचा दरवाजाही उघडा होता अणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले होते. त्यामुळे राजपूत यांचा संशय बळावला. त्यांनी तत्काळ बंदोबस्तावरील मिहीर रंजन यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी संशयास्पदरीत्या फि रत असल्याचे आढळून आल्यामुळे भारत अशोक देवरे यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. यावेळी राजपूत यांनी माहिती वरिष्ठांना कळविल्यानंतर निवासस्थानाजवळ सुभेदार सोलंकी सुरेंदर हे दाखल झाले. यावेळी सुभेदार यांच्यादेखत शिपाई मिहीर व राजपूत यांनी संशयित देवरे यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या पँटच्या खिशात राजपुत यांचा मोबाइल मिळून आला. देवरे हे जयभवानीरोड, उपनगर येथे वास्तव्यास असून, सेवानिवृत्त लष्करी अधिकारी म्हणून ओळखपत्र दाखवून ते देवळाली तोफखाना केंद्रात वावरत असल्याचे समोर आले आहे.
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?
भारत अशोक देवरे हे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी असल्यानंतर ते देवळाली तोफखाना केंद्राच्या प्रशिक्षणार्थी निवासस्थानापर्यंत कसे पोहचले आणि त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या खोलीत प्रवेश मिळवून चोरी केली. यामुळे तोफखाना केंद्रामधील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Web Title: Mobile theft from retired army officer Deolali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.