मनसेतर्फे चांदवडला इंधनवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 02:01 AM2018-06-09T02:01:42+5:302018-06-09T02:01:42+5:30

चांदवड : तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी (दि.७) पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढीचा निषेध म्हणून नायब तहसीलदार रुपेश सुराणा यांना गाजर देऊन निवेदन दिले. भाजपा-शिवसेना सरकारने गोरगरीब जनतेचा विश्वासघात करून पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ करून कशाप्रकारे लूटमार सुरू केली आहे.

 MNS protesting the rise of Chandwad | मनसेतर्फे चांदवडला इंधनवाढीचा निषेध

मनसेतर्फे चांदवडला इंधनवाढीचा निषेध

Next

चांदवड : तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी (दि.७) पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढीचा निषेध म्हणून नायब तहसीलदार रुपेश सुराणा यांना गाजर देऊन निवेदन दिले. भाजपा-शिवसेना सरकारने गोरगरीब जनतेचा विश्वासघात करून पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ करून कशाप्रकारे लूटमार सुरू केली आहे.
ही लूटमार त्वरित थांबवावी, शेतमालाला योग्य दर द्यावेत, इंधनाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल ने-आण करण्यासाठी भुर्दंड सहन करावा लागत असून, जीवनाश्यक वस्तूंच्या किमती कमी कराव्यात, शेतकºयांचे सरसकट कर्जमाफ करावे, सातबारा कोरा करावा, चांदवड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या झालेल्या
कामांची चौकशी करावी, इस्टिमेट पद्धतीने कामे नसल्यास ठेकेदारांचे लायसन्स रद्द करावे, शिवरस्ते व जमिनीचे वाद केसेस प्रांत व तहसीलदारांनी त्वरित निकाली काढून न्याय द्यावा. यासाठी चांदवड तालुक्याच्या वतीने गाजरवाटप करून निषेध करण्यात आला व शेतकरी आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला. या मागण्या त्वरित पूर्ण न केल्यास मनसे स्टाइलने आंदोलन छेडू, असा इशारा निवदेनात दिला आहे. यावेळी संपत वक्ते, प्रकाश शिंदे, भाऊसाहेब कलवर, विकास गोजरे, मंगलाताई वडजे, शरद अहेर, योगेश पाटील, भागवत झाल्टे, नाना चौधरी, दत्तू वाढवणे, गोविंद गांगुर्डे, श्रीहरी
ठाकरे, संजय गुंजाळ, सागर वडजे, योगेश मांदळे आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title:  MNS protesting the rise of Chandwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.