किरकोळ जखमी : राखीव वनात ट्रेकिंग करताना बिबट्यासोबत भेट घडते तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 04:42 PM2019-03-21T16:42:09+5:302019-03-21T16:49:43+5:30

पांडवलेणीचा परिसर राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित आहे. येथील पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाचे संपूर्ण क्षेत्र जे पांडवलेणी डोंगराच्या पाठीमागील बाजूने पायथ्याला लागून आहे.

Minor injuries: When traveling with a leopard while traveling in a reserve forest ... | किरकोळ जखमी : राखीव वनात ट्रेकिंग करताना बिबट्यासोबत भेट घडते तेव्हा...

किरकोळ जखमी : राखीव वनात ट्रेकिंग करताना बिबट्यासोबत भेट घडते तेव्हा...

Next
ठळक मुद्देट्रेकर्स ग्रुपचे ‘पिकॉक’ असे नाव आहे. बिबट्याला धोक्याची जाणीव झाल्याने त्याने चाल केली असावी

नाशिक :पांडवलेणी परिसरातील राखीव वनक्षेत्र घोषित असलेल्या डोंगरावर विनापरवाना ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका तीस वर्षीय युवकावर बिबट्याने चाल क रत पंजा मारला. मात्र वेळीच सावध झालेला तरुण आणि चढावरून तोल गेल्याने बिबट्या खाली घसरल्यामुळे ट्रेकर्स थोडक्यात वाचला.
याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, पांडवलेणीचा परिसर राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित आहे. येथील पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाचे संपूर्ण क्षेत्र जे पांडवलेणी डोंगराच्या पाठीमागील बाजूने पायथ्याला लागून आहे. हा संपूर्ण परिसर वनविकास महामंडळाच्या अखत्यारित येतो. तसेच डोंगरावरील झाडांचे क्षेत्र हे राखीव वन आहे. यामुळे या भागात ट्रेकिंगसाठी जाण्यापूर्वी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक ठरते; मात्र काही उत्साही ट्रेकर्स डोंगराच्या पाठीमागून ट्रेकिंगच्या नावाखाली विनापरवाना चढाई करतात. गणेश पांडुरंग पानसरे (३०, रा. साईबाबानगर, सिडको) हा आपल्या काही मित्रांसोबत गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ट्रेकिंग करण्यासाठी पांडवलेणी डोंगरावर चढाई करू लागला. दरम्यान, त्याच्यासोबत असलेले अन्य मित्र हे डोंगराच्या पायथ्याशी थांबून होते. त्यांच्या ट्रेकर्स ग्रुपचे ‘पिकॉक’ असे नाव आहे. पानसरे हा डोंगराच्या मध्यापर्यंत पोहचल्यानंतर कपारीत दडून बसलेल्या बिबट्याला धोक्याची जाणीव झाल्याने त्याने चाल केली असावी, असे सूत्रांनी सांगितले. सुदैवाने बिबट्याच्या या हल्ल्यात पानसरे बचावला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

Web Title: Minor injuries: When traveling with a leopard while traveling in a reserve forest ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.