मजुरांनी लांबविले लाखोंचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:35 AM2019-03-28T00:35:11+5:302019-03-28T00:35:32+5:30

दिंडोरीरोडवरील गायत्रीनगर परिसरात इमारतीच्या फ्लॅटमध्ये टेरेसचे पत्रे बदलण्याच्या कामासाठी आलेल्या दोघा मजुरांनी टेरेसमध्ये ठेवलेल्या कपाटातून सुमारे सव्वा लाख रु पये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 Millions of jewelery longevity workers | मजुरांनी लांबविले लाखोंचे दागिने

मजुरांनी लांबविले लाखोंचे दागिने

Next

पंचवटी : दिंडोरीरोडवरील गायत्रीनगर परिसरात इमारतीच्या फ्लॅटमध्ये टेरेसचे पत्रे बदलण्याच्या कामासाठी आलेल्या दोघा मजुरांनी टेरेसमध्ये ठेवलेल्या कपाटातून सुमारे सव्वा लाख रु पये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी साईसेवा सोसायटीत राहणाऱ्या जानकीराम वामन पाटील यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीची तक्र ार दाखल केली असून, दोघा संशयित मजुरांना अटक केली आहे.
गायत्रीनगर परिसरातील साई सेवा सोसायटीमधील पाटील यांच्या घरात कामासाठी मजूर लावण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापासून पत्रे बदलण्याचे काम सुरू असल्याने वैभव संजय सूर्यवंशी, ऋषिकेश अनिल घोलप दोघे काम करण्यासाठी येत होते. त्यांनी टेरेसमध्ये ठेवलेल्या कपाटातून दोघा संशयित आरोपींनी सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
चोरीची घटना पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ म्हसरूळ पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार संशयित सूर्यवंशी व घोलप या दोघा मजुरांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Millions of jewelery longevity workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.