पाण्याच्या दुष्काळामुळे नागरिकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 06:53 PM2019-05-16T18:53:06+5:302019-05-16T18:55:23+5:30

मातोरी : दुष्काळाने महाराष्ट्रतील बहुतेक भाग होरपळून निगत आहे सर्वसामाण्याचे जगणेही मुश्कील झाले आहे, बहुतेक गावाकडच्या लोकांनी आपल्या पोटाची खळगी मिळेल त्या गावात जाऊन भरायची मिळेल तो रोजगार करून आपल्या लेकरा बाळांना जगवायचे असे ठरून गाव सोडलेल्या नागरिकांनी आसरा घेतलाय.

 Migrating citizens due to water drought | पाण्याच्या दुष्काळामुळे नागरिकांचे स्थलांतर

पाण्याच्या दुष्काळामुळे नागरिकांचे स्थलांतर

Next
ठळक मुद्दे पेठ तालुक्यातील गावे लागली होरपळू; रोजगाराकरीता भटकंती सुरु

मातोरी : दुष्काळाने महाराष्ट्रतील बहुतेक भाग होरपळून निगत आहे सर्वसामाण्याचे जगणेही मुश्कील झाले आहे, बहुतेक गावाकडच्या लोकांनी आपल्या पोटाची खळगी मिळेल त्या गावात जाऊन भरायची मिळेल तो रोजगार करून आपल्या लेकरा बाळांना जगवायचे असे ठरून गाव सोडलेल्या नागरिकांनी आसरा घेतलाय.

मातुलेस्वर पटांगनाचा, दुष्काळात जगण्यासाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी नाशिक शहरात व आजूबाजूच्या परिसरात पेठ हरसूल या तालुक्यातील ग्रामीण भागातील कुटुंब स्थलांतरित होताना दिसताहेत असेच मातोरी गावातील मातुलेस्वर पटांगणात गेल्या दहा बारा दिवसापासून राहत असलेल्या नागरिकांशी चर्चा केल्यावर असे समजले कि पेठ तालुक्यातील गोटविहीर व इतर भागात पिण्याच्या पाण्याची भीषण गैरसोय असल्याने तेथील सुमारे दोनशे लोकांनी आपल्या कुटुंबासह गाव सोडण्याचा निर्णय घेतला, गावात पाणी नाही चार ते पाच किलोेमिटर वरून हंडाभर पाण्यासाठी जीवाचे रान करावे लागत असल्याने जगायचे कसे व कुटुंबाला जगवायचे कसे हा गंभीर प्रश्न उभा ठाकल्याने कुटुंबाला घेऊन गावातील तरुण तसेच जेष्ठ मंडळींनी गावातून काढता पाय घेत गावोगावी रोजंदारीवर काम करत उदरनिर्वाह करत आहेत.
गावातील बहुतेक नागरिकांची मुले हि शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेत आहेत परीक्षा संपून बहुतेक मुले सुट्यांमध्ये गावाकडे परतली आहेत, दरसाल सट्टीत मुलांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पालकांच्या मते मुले आश्रमशाळेतच सुखी होते. गावाकडे पाणी नसल्याने आपल्याबरोबरीने त्यांनाही गावोगावी घेऊन फिरण्याची वेळ आली आहे, आज मातोरीत दिवसभर मिळेल ते काम करून हि मंडळी आपले जगण्याचे साधन करत आहे.

१) आमच्या गावापासून दहा ते बारा किलोमीटरवर दमण नदी आहे, पण गावात पाणीपुरवठा नाही. पाण्यासाठी दूर जावे लागत असल्याने आम्ही आमची मुले घेऊन नाशिकला आलो आहोत.
- संतोष भसरे (बोर पाडा)
२) हंडाभर पाण्यासाठी खूप वनवन करायला लागत असल्याने खूप त्रास होतो, पूर्ण गावात व परिसरात पाणी कमी पडल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे जेव्हा पाऊस तेव्हाच गावाकडे जायचे असे आम्ही ठरविले आहे.
- भारती भोये (गोठ विहीर)
३) मतदान प्रचारासाठी आलेले पुढारी मतदान झाल्यावर आमच्या अडचणी विसरून जातात, गावाकडे वीज फक्त चार तास राहते पिण्यासाठी पाणी नाही, टॅकर पोहोचायल रस्ते नाही अशी अवस्था असल्याने आम्हाला जगण्याचा पर्याय शोधावा लागतो आहे.
- देवराम गालफ (बोरपाडा)
 

Web Title:  Migrating citizens due to water drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.