पराक्रमी योद्धा : येवल्याचे भूमिपुत्र तात्या टोपे यांचे आज पुण्यस्मरण १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील धगधगता अंगार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:09 AM2018-04-18T00:09:47+5:302018-04-18T00:09:47+5:30

येवले- प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात आपली आहुती देत, स्वातंत्र्ययुद्धाची पताका हातात घेऊन संघर्ष करणारा एक योद्धा म्हणून १८५७च्या स्वातंत्र्यसमरातील थोर सेनानी तात्या टोपे चिरकाल स्मृतीत राहतील.

The mighty warrior: Baitiputta Tanti Tope, who is nowhere in the limelight, is today the fate of the freedom fighter 1857! | पराक्रमी योद्धा : येवल्याचे भूमिपुत्र तात्या टोपे यांचे आज पुण्यस्मरण १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील धगधगता अंगार!

पराक्रमी योद्धा : येवल्याचे भूमिपुत्र तात्या टोपे यांचे आज पुण्यस्मरण १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील धगधगता अंगार!

googlenewsNext
ठळक मुद्देमाणिक बसवलेली टोपी तात्यांना बक्षीस दिलीजन्मशताब्दीमध्ये सर्वप्रथम एक समिती गठीत करण्यात आली

येवले-प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात आपली आहुती देत, स्वातंत्र्ययुद्धाची पताका हातात घेऊन संघर्ष करणारा एक योद्धा म्हणून १८५७च्या स्वातंत्र्यसमरातील थोर सेनानी तात्या टोपे चिरकाल स्मृतीत राहतील. टोपेंचे मूळ आडनाव येवलेकर. बाजीराव पेशव्यांनी नऊ रत्ने व माणिक बसवलेली टोपी तात्यांना बक्षीस दिली, म्हणूनच येवलेकर या आडनावाऐवजी ‘टोपे’ हे आडनाव रूढ झाले, आणि तात्या येवलेकर हे ‘तात्या टोपे’ झाले. येवला येथे पांडुरंगपंत अण्णा टोपे राहत होते. त्यांना आठ मुले. रामचंद्र पांडुरंग टोपे तथा तात्यांचा जन्म १८१४ सालचा. त्यांचे वडील पांडुरंगपंत वेदशास्त्रसंपन्न. येवला मुक्कामी असताना पांडुरंगपंतांची पेशव्यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळे यांच्या मध्यस्थीने बाजीराव पेशव्यांच्या दरबारी धर्मादाय खात्यात नेमणूक झाली. तात्या पाच वर्षांचे असतानाच त्यांचे वडील येवल्यातून गेले. नानासाहेब पेशवे अर्थात तात्यांचे धनी नानासाहेब पेशवे हे जरी तात्यांपेक्षा १० वर्षांनी लहान असले तरी दोघेही अगदी मित्रांप्रमाणे राहत. नानासाहेब, तात्यासाहेब आणि झाशीची राणी यांनी एकत्रित युद्धकला आत्मसात केली. १८५६ मध्ये लॉर्ड डलहौसी या भारतातील गव्हर्नरने पेशवाईचा किताब रद्द केला. या मुळातूनच नानासाहेब व तात्यासाहेब यांनी क्रांतीचा संदेश देशभर पोहचविला. ३१ मे १८५७ रोजी संपूर्ण भारतभर एकाच वेळी सशस्त्र क्र ांती करण्याचा ठरलेला बेत. दुर्दैवाने हा संग्राम भारतभर एकाच वेळी झाला नाही. बराकपूर रेजिमेंटचा वीर मंगलपांडे याने ह्यूगसन या इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या. या खटल्यात एप्रिल १८५७ मध्ये मंगल पांडे फासावर चढला आणि १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा पहिला हुतात्मावीर ठरला. या पाठोपाठ १० मे १८५७ ला ‘मारो फिरंगी को’ या मीरत फटणीच्या क्र ांतीच्या भडक्याने इंग्रज पुरते हादरले. या अनुकूल संधीची वाट नाना व तात्या पाहत होते. अशा परिस्थितीत, इंग्रजांनाही या जोडीवर संशय नसल्याने कानपूरच्या इंग्रज अधिकारी ह्यूंग व्हिलरने खजिना रक्षणासाठी नाना व तात्या यांची मदत मागितली. हिंदी फौजांना उठाव करण्याची नामी संधी चालून आली. सैनिकी विद्रोहाची रचना करून त्यांनी इंग्रजांचा खजिना ताब्यात घेतला. इंग्रजांच्या एका सैनिकी फलटणीने घनघोर युद्धात नानासाहेब व तात्यासाहेबांचा पराभव झाला. स्वातंत्र्यज्योत प्रज्वलित ठेवणारे तात्या शिवराजपूरला आले. गनिमी काव्याचा वापर करून तात्यांनी इंग्रज फौजेला धूळ चारली. चरखारीच्या राजाजवळ फितुरी करणाºया देशद्रोही शासकांना तात्यांनी धडा शिकवला. पुढे झाशीच्या राणीने तात्यांकडे साहाय्य मागितले. आपल्या सैन्यानिशी तात्या इंग्रजांवर बेधडक तुटून पडले. तरीही झाशी वाचली नाही. ह्यूज रोज या इंग्रज अधिकाºयाने तात्यांच्या सैन्याचा धुव्वा उडविला. तात्या ग्वाल्हेरला आले. रोजने ग्वाल्हेरवर चढाई केली व तात्यांना पकडण्यासाठी शिकस्त केली. अखेर फंदफितुरीचा आधार घेत इंग्रजांनी तात्यांना पकडले. दोन दिवस खटला चालला. तात्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. शिवपुरी किल्ल्यात १८ एप्रिल रोजी स्वत:हून दोर गळ्यात अडकवून घेत तात्या हसत हसत फासावर गेले. तात्या टोपे यांची स्मृती जागृत राहावी म्हणून येवल्यात त्यांच्या जन्मस्थानी स्मारक व्हावे या उद्देशाने १९५७ साली त्यांच्या जन्मशताब्दीमध्ये सर्वप्रथम एक समिती गठीत करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष वसंतराव गुप्ते होते. येवल्याचे भूमिपुत्र मुंबईचे शेरिफ, कुलगुरू टी.के. टोपे, डॉ. डी.एस. खत्री, ज्येष्ठ पत्रकार रमेशचंद्र पटेल यांच्यासह सात लोक या समितीचे सदस्य होते. जन्मस्थळी सेनापतींचा पुतळा बसवावा हा विचार पुढे आला. मूर्तिकार वासुदेव कुलकर्णी यांनी टोपे यांचा अर्धाकृती पुतळा बनवला. तब्बल दोन वर्ष हा पुतळा सार्वजनिक वाचनालयात ठेवण्यात आला होता. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेकांनी वाचनालयात पुतळ्याला पुष्पहार घातल्याचा इतिहास आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला सन १९६० या दिवशी लोकवर्गणीतून पुतळा बसवण्याचे काम सुरू झाले. विजयादशमीच्या मुहूर्तावर सेनापती बापट यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन झाले.

Web Title: The mighty warrior: Baitiputta Tanti Tope, who is nowhere in the limelight, is today the fate of the freedom fighter 1857!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास