मध्यरात्रीची घटना : गंगाघाटावरील प्रकार; समाजकंटकांचे कृत्य, साहित्य खाक विक्रेत्यांच्या टपºया जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:13 AM2018-01-20T01:13:49+5:302018-01-20T01:14:22+5:30

Midnight incident: Types of Ganges; The articles of exploiters, materials and articles were sold by the manufacturer | मध्यरात्रीची घटना : गंगाघाटावरील प्रकार; समाजकंटकांचे कृत्य, साहित्य खाक विक्रेत्यांच्या टपºया जाळल्या

मध्यरात्रीची घटना : गंगाघाटावरील प्रकार; समाजकंटकांचे कृत्य, साहित्य खाक विक्रेत्यांच्या टपºया जाळल्या

Next
ठळक मुद्देकोणतीही जीवितहानी नाहीएकापाठोपाठ टपºयांनी पेट घेतला

पंचवटी : गंगाघाटावरील सांडव्यावरची देवी मंदिरामागे असलेल्या हळदी-कुंकू तसेच लग्न सोहळ्यात लागणारे रुखवंत व अन्य कटलरी साहित्यांची विक्री करणाºया तब्बल दहा टपºया अज्ञात समाजकंटकांनी शुक्रवार (दि. १९) पहाटेच्या सुमाराला जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र टपºयांमधील किमती साहित्य जळून खाक झाल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. परिसरात पहाटेच्या सुमाराला काही टवाळखोर तसेच मद्यपींचा वावर असल्याने त्यांनीच टपºया जाळून नुकसान केल्याचे बोलले जात आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात रिझवान अख्तार यांनी खबर दिली असून, त्यानुसार पोलिसांनी अकस्मात जळीतची नोंद केलेली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, गंगाघाटावरील सांडव्यावरची देवी मंदिरामागे अनेक वर्षांपासून पंधरा ते वीस हळदी, कुंकू विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली आहेत. या दुकानात लग्नसोहळ्यात लागणारे साहित्य, पूजेच्या वस्तू तसेच अन्य कटलरी साहित्यांची विक्री केली जाते. शुक्रवारी पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमाराला अज्ञात समाजकंटकांनी या टपºयांभोवती आग लावली. टपºया रांगेत असल्याने एकापाठोपाठ टपºयांनी पेट घेतला त्यात काही लाकडी टपºया असल्याने तसेच टपºयात कापडी माल व अन्य वस्तू असल्याने त्या वस्तूंनी लागलीच पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने अवघ्या काही तासांतच लाकडी टपºयांसह दुकानातील माल जळाल्याने अक्षरश: कोळसा झाला. व्यावसायिकांच्या टपºया जळाल्याचे वृत्त कळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली होती. सदर टपºया कोणी व का जाळल्या याचे कारण गुलदस्त्यात असले तरी अज्ञात समाजकंटकांनी जाणूनबुजून हे कृत्य केले असल्याचे बोलले जात आहे. समाजकंटकांनी जाळपोळ केली यात अखजल अख्तार, अजमल अख्तार, संजय परदेशी, इम्रान सय्यद अख्तार, रिझवान अख्तार, सुभाष कुमावत, विठ्ठल बोडके, राधिका वाकचौरे, शंकर शेजवळ आदींच्या टपºया जळाल्यात.

Web Title: Midnight incident: Types of Ganges; The articles of exploiters, materials and articles were sold by the manufacturer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग