मक्याने ओलंडला अठराशेचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 06:14 PM2019-01-17T18:14:12+5:302019-01-17T18:14:28+5:30

एकीकडे सातत्याने ढासळणाºया कांद्याच्या दराने सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना दुसरीकडे शासनाने जाहीर केलेल्या मक्याच्या हमी भावाला डावलून येवला बाजार समितीत मक्याच्या दराने १८०० रूपयांचा टप्पा ओलांडून विक्रम केला असून त्यामुळले शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येवला बाजार समितित मक्याला प्रती क्विंटल किमान १७४२ रूपये कमाल १८०५ रूपये तर सरासरी १७८१ रु पये बाजारभाव मिळाला.

Mickey's eighteenth stage of the Olympia | मक्याने ओलंडला अठराशेचा टप्पा

मक्याने ओलंडला अठराशेचा टप्पा

Next
ठळक मुद्देविक्रम : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा

येवला : एकीकडे सातत्याने ढासळणाºया कांद्याच्या दराने सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना दुसरीकडे शासनाने जाहीर केलेल्या मक्याच्या हमी भावाला डावलून येवला बाजार समितीत मक्याच्या दराने १८०० रूपयांचा टप्पा ओलांडून विक्रम केला असून त्यामुळले शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येवला बाजार समितित मक्याला प्रती क्विंटल किमान १७४२ रूपये कमाल १८०५ रूपये तर सरासरी १७८१ रु पये बाजारभाव मिळाला.
शासनाने जाहीर केलेला हमीभाव ओलांडून मकाला थेट अठराच्या अधिक भाव मिळत आहे.या भावामुळे शेतकरी मात्र समाधान व्यक्त करत आहे. कांद्याच्या दराने पदरी निराशा पडली असली तरी मक्याच्या विक्र ीतून कांद्याची तूट भरून निघणार जरी नसली शेतकर्यांना आर्थिक आधार तरी मिळेल अशी चर्चा शेतकरी वर्ग करत आहेत.
नाशिक जिल्ह्यासह येवला तालुक्यात दरवर्षी कांदा व कपाशीच्या उत्पादनात शेतकरी अग्रेसर असतात.येवला तालुक्यातील कांदा व कपाशी उत्पादनात मात्र घट झाली असल्याचे दिसून येत आहे. पालखेड आवर्तनातून काहीसा दिलासा मिळाला असला तरी कपाशीला मोठ्या प्रमाणात पाणी द्यावे लागते त्यात विहिरी, बोअरवेल याना पाण्याची कमतरता असल्याने कपाशी उत्पादनात दरवर्षी च्या तुलनेत यंदा घट झाली असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. दुष्काळी तालुक्याला आता आधार म्हणून मकाचा उत्तम पर्याय मिळाला
आहे.
केवळ १८ हजार ६७४ सर्वसाधारण क्षेत्र असताना त्याच्या दुप्पट म्हणजे ३५ हजार ५९० हेक्टरवर शेतकर्यांनी यंदा मका लावली.मात्र यावर्षी क्षेत्र वाढले पण दरवर्षी जेथे २५ ते ३५ क्विटंल मका पिकवली तेथेच यंदा एकरी सरासरी १० ते १५ क्विटंल उत्पादन निघाले.असे असले तरी दुष्काळामुळे लागवड वाढल्याने मकाचे उत्पादनाची सरासरी टिकून आहे.
मका उत्पादक राज्यात घटलेले उत्पादन आण िसद्यस्थितीत पोल्ट्रीसह इतर व्यावसायिकांकडून वाढलेली मागणी यामुळे भावाने विक्र म नोंदवला आहे.काही शेतकर्यांनी हमीभावाने मका विकला असला तरी अनेकांनी मात्र शेती कामांच्या गर्दीत मका साठवून ठेवली होती.आता भाव वाढल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात मका विक्र ीला आणत आहेत.
दरवर्षी शासनाने जाहीर केलेल्या भावापेक्षा खासगी बाजारात दोनशे ते तीनशे रु पये मकाला कमी दर मिळतो. यावर्षी मात्र शासनाने एक हजार 700 रु पयांचा हमीभाव जाहीर केला असला तरी खाजगी बाजारात मात्र 1 हजार 826 हा उच्चांकी भाव मिळाला आहे. मागील पन्नास वर्षांत मिळाला नसेल इतका उच्चांकी भाव यंदा दुष्काळामुळे शेतकºयांच्या वाट्याला आला असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

Web Title: Mickey's eighteenth stage of the Olympia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.