म्हाडाच्या अध्यक्षांनी केली प्रकल्पाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:47 PM2018-12-15T22:47:12+5:302018-12-16T00:25:01+5:30

दीड वर्षांपूर्वी वादात सापडलेल्या आडगावातील बहुचर्चित म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पाला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी भेट देत कामाची पाहणी केली तसेच किरकोळ दुरुस्तीच्या सूचना अधिकाºयांना दिल्या आहेत.

MHADA Chairman said the project was inspected | म्हाडाच्या अध्यक्षांनी केली प्रकल्पाची पाहणी

म्हाडाच्या अध्यक्षांनी केली प्रकल्पाची पाहणी

Next
ठळक मुद्देआडगाव : दुरुस्तीच्या अधिकाऱ्यांना सूचना

आडगावातील बहुचर्चित म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पाला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी भेट देत कामाची पाहणी केली. समवेत अधिकारी व कर्मचारी.
आडगाव : दीड वर्षांपूर्वी वादात सापडलेल्या आडगावातील बहुचर्चित म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पाला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी भेट देत कामाची पाहणी केली तसेच किरकोळ दुरुस्तीच्या सूचना अधिकाºयांना दिल्या आहेत.
आडगाव येथील ग्रामस्थांनी पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाला प्रखर विरोध केल्यामुळे हा प्रकल्प दीड वर्षांपूर्वी चांगलाच गाजला होता. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आडगावकरांनी बहिष्कार टाकला होता, पण ग्रामस्थांच्या विरोधाला झुगारून मागीलवर्षी कामाला सुरुवात झाली असून, आता हा बहुचर्चित प्रकल्पाची १४० सदनिकांची इमारत पूर्णत्वास आली असून, एप्रिल २०२० पर्यंत काम पूर्ण होणार आहे. यावेळी म्हाडाचे मुख्य अधिकारी रमेश मिसाळ, कार्यकारी अभियंता दिनेश श्रेष्ठ, उपभियंता के. के. जाधव यांच्यासह म्हाडाचे कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
आडगावातील म्हाडा प्रकल्पाला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी गुरुवारी दुपारी भेट देत कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वच्छतागृहामध्ये वयोवृद्धांच्या सोयीसाठी साधे भांडे बसविण्याऐवजी कमोड बसविण्याच्या सूचना केल्या तसेच मोकळ्या जागेमध्ये ग्रीन जीम, वाचनालय, अशा सर्व सुविधा पुरविण्याच्या सूचना केल्या.

Web Title: MHADA Chairman said the project was inspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.