नाशिककरांसाठी आता २0२३ मध्ये मेट्रो बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 01:18 AM2019-07-14T01:18:02+5:302019-07-14T01:18:17+5:30

सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने शहरात टायर्ड बेस मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याचे ‘महामेट्रो निओ’ असे नामकरण करण्यात आले असून, हा प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यासाठी खास तयारी सुरू असून, शहरवासीयांसाठी लवकरच सादरीकरण करण्यात येणार आहे.

Metro bus in Nashik now 2023 | नाशिककरांसाठी आता २0२३ मध्ये मेट्रो बस

नाशिककरांसाठी आता २0२३ मध्ये मेट्रो बस

Next
ठळक मुद्देमहामेट्रोे निओ नामकरण ; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणार

नाशिक : सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने शहरात टायर्ड बेस मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याचे ‘महामेट्रो निओ’ असे नामकरण करण्यात आले असून, हा प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यासाठी खास तयारी सुरू असून, शहरवासीयांसाठी लवकरच सादरीकरण करण्यात येणार आहे.
धार्मिक आणि औद्योगिक क्षेत्र म्हणून परिचित असलेल्या नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिकेची स्वत:ची बससेवा सुरू होत आहे. पर्यंत त्यापलीकडे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकसाठी मेट्रो बस सुचविली होती. त्यासंदर्भातील प्रस्तावदेखील आता पूर्णत्वाकडे असून, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आता नाशिक मेट्रोचे ‘मेट्रो निओ’ असे नामकरण केले आहे. त्याचबरोबर त्याच्या अंमलबजावणीचीदेखील तयारी केली आहे.
सदरची टायर बेस्ड मेट्रोची लांबी २५ मीटर आणि प्रवासी क्षमता २५० असलेली बस असेल. बॅटरी आणि इलेक्ट्रिकवर आधारित ही बस असून, त्यासाठी तीन मार्ग प्रस्तावित आहे. त्याअंतर्गतच गंगापूर गाव, शिवाजीनगर, श्रमिकनगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, सारडा सर्कल, द्वारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्तमंदिर हा पहिला २२ किलो मीटरचा मार्ग आहे, तर गंगापूर जलालपूर, नवश्या गणपती, थत्तेनगर, मुंबई नाका असा दुसरा १० किलोमीटरचा मार्ग असेल.
मुंबई नाका ते सातपूर कॉलनी व्हाया गरवारे, असा तिसरा मार्ग असणार आहे. वाहतुकीचे दोन कोरीडॉर असतील हे काम २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे.
लवकरच सादरीकर
शहरात घरभेटी व अन्य माहितीच्या आधारे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेने औपचारिक परवानगी हरियाणा स्थित कंपनीस दिली आहे. परंतु त्यापलीकडे जाऊन प्रकल्पाची माहिती नाशिककरांना व्हावी यासाठी लवकरच सादरीकरण होणार आहे. यापूर्वी हे सादरीकरण २९ जून रोजी होणार होते. मात्र, काही कारणामुळे ते रद्द झाले होते.

Web Title: Metro bus in Nashik now 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.