पारा १०.६ अंशावर : नाशिककरांना थंडीच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 9:00pm

शहरात शनिवारी ८.८, रविवारी ९.२ तर सोमवारी ९.४ इतके किमान तपमान शहरामध्ये पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने नोंदविले आहे. दरम्यान, मंगळवारी पुन्हा पारा घसरल्याने थंडीची तीव्रता वाढल्याचा अनुभव नागरिकांना आला होता.

नाशिक : शहराच्या किमान तपमानात बुधवारी (दि.३) पुन्हा वाढ झाली. तपमान १०.६ अंश इतके नोंदविले गेल्याने थंडीचा कडाका कमी झाल्याचे नाशिककरांना जाणवले. बुधवारी संध्याकाळीदेखील हवेत फारसा गारवा निर्माण झाल्याचे जाणवले नाही. मागील दोन दिवसांपासून शहराच्या किमान तपमानात वाढ होऊ लागली होती; मात्र अचानकपणे लहरी निसर्गाने रूप बदलले असून, मंगळवारी तपमान पुन्हा कमी होऊन पारा ८.२ अंशांपर्यंत घसरला; मात्र बुधवारी थेट दोन अंशांनी पारा वर सरकल्याने नाशिककरांना कडाक्याच्या थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला. पंधरवड्यापासून नाशिकचे किमान तपमान १० अंशाच्या खाली राहत असल्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली होती. बुधवारी प्रथमच तपमानाचा पारा १० अंशाच्या पुढे सरकल्याने नाशिककरांना बोच-या थंडीपासून काहीसा आधार मिळाला. शहरात शनिवारी ८.८, रविवारी ९.२ तर सोमवारी ९.४ इतके किमान तपमान शहरामध्ये पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने नोंदविले आहे. दरम्यान, मंगळवारी पुन्हा पारा घसरल्याने थंडीची तीव्रता वाढल्याचा अनुभव नागरिकांना आला होता. संध्याकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांनी स्वत:ला बंदिस्त क रून घेतल्याचे दिसून आले. पहाटेही थंडी मोठ्या प्रमाणात जाणवत होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत हवेत गारवा कायम होता; मात्र बुधवारी याविरुध्द स्थितीचा अनुभव नागरिकांनी घेतला. पारा अचानकपणे एका दिवसात दोन अंशांनी वाढ झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली. डिसेंबरअखेर थंडीने नाशिकक रांना तीव्र तडाखा दिला होता. कडाक्याच्या थंडीने नाशिककरांना हुडडुडी भरली होती. हंगामातील नीचांकी ७.६ अंश इतकी किमान तपमानाची नोंद २९ डिसेंबरला झाली होती.

संबंधित

वाचन संस्कृती वाढविण्याची गरज : प्रांजली कुलकर्णी
डोंगरगाव येथे पीरसाहेब यात्रोत्सव
येवल्यातील अतिक्र मणे जमीनदोस्त
नाशिकच्या मविप्र वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालयातील व्हेंटिलेटरमध्ये आढळले झुरळ
मृत्यूचा सापळा : मातोरी-गिरणारे राज्य महामार्गावर एक ठार

नाशिक कडून आणखी

अपघातात दोन भावी सनदी लेखापालांचा मृत्यू
‘स्मार्ट रोड’ लांबणीवर पडण्याची चिन्हे
नाशिक पुन्हा तापले; पारा ३९ अंश
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने  अनधिकृत बांधकाम हटवले
पाच पिस्तुले;२२ जिवंत काडतुसे

आणखी वाचा