मे महिन्यात होणार वैद्यकीय ‘नीट’ परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:50 AM2018-12-21T01:50:32+5:302018-12-21T01:50:46+5:30

राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा तथा ‘नीट २०१९’ परीक्षेचे वेळापत्रकानुसार परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील वर्षी मे महिन्यात ही परीक्षा होणार आहे. यावर्षी ही नॅशनल टेस्ट एजन्सी म्हणजेच एनटीएच्या माध्यमातून घेण्यात येणार असून, यावर्षी देशभरातून सुमारे १३ लाखांहून तर नाशिकमधून जवळपास दहा हजार अधिक विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट होण्याची शक्यता आहे.

Medical 'neat' examination will be held in May | मे महिन्यात होणार वैद्यकीय ‘नीट’ परीक्षा

मे महिन्यात होणार वैद्यकीय ‘नीट’ परीक्षा

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातून दहा हजार विद्यार्थी

नाशिक : राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा तथा ‘नीट २०१९’ परीक्षेचे वेळापत्रकानुसार परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील वर्षी मे महिन्यात ही परीक्षा होणार आहे. यावर्षी ही नॅशनल टेस्ट एजन्सी म्हणजेच एनटीएच्या माध्यमातून घेण्यात येणार असून, यावर्षी देशभरातून सुमारे १३ लाखांहून तर नाशिकमधून जवळपास दहा हजार अधिक विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट होण्याची शक्यता आहे.
बारावीची परीक्षा देणारे व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी अर्ज केले असून, खुल्या प्रवर्गातून किमान १७ ते २५ वर्ष वय व ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातीस ३० वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी मिळाल्याने यावर्षी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता शैक्षणिक क्षेत्रात व्यक्त होत आहे. देशभरातील सुमारे ६८ हजार २८ एमबीबीएस व २ लाख ७१ हजार ४८ बीडीएस व आयुष महाविद्यालयांतील जागांवर प्रवेशासाठी ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी १ नोव्हेंबरपासून सुरू असलेली अर्ज प्रक्रिया ७ डिसेंबरला पूर्ण झाली असून ‘नीट’साठी अर्ज करणाºया विद्यार्थ्यांना १५ एप्रिलला परीक्षेचे प्रवेशपत्र आॅनलाइन मिळणार आहे.
तर दि. ५ जून २०१९ला निकाल जाहीर होणार असल्याची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Web Title: Medical 'neat' examination will be held in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.